
इंग्लंड (England)-ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील टी-20 मालिका नुकतीच संपुष्टात आली. साउथॅम्प्टन (Southampton) येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 विकेटने विजय मिळवला, पण इंग्लंडने 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. बहुप्रतिष्ठित इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत आणि ही आंतरराष्ट्रीय मालिका आयपीएलमध्ये (IPL) खेळणाऱ्या दोन्ही टीमच्या खेळाडूंसाठी एक सराव म्हणून सिद्ध झाली. आयपीएलच्या लिलावात यंदा सर्वात महागडा खेळाडू म्हणून सिद्ध झालेला पॅट कमिन्स, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith), सनरायझर्स हैदराबादची सलामी जोडी डेविड वॉर्नर (David Warner) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांचा देखील समावेश होता. इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधील या टी-20 मालिकेतील खेळाडूंची कामगिरी पाहून आयपीएल फ्रँचायझीच्या डोकेदुखीत वाढ होईल. या लेखात 'त्या' 5 खेळाडूंबद्दल जाणून घेणार जे टी-20 मालिकेत फ्लॉप झाले. (ENG vs AUS 3rd T20I: तिसर्या टी-20 सामन्यात इंग्लंड 5 विकेट पराभूत, ऑस्ट्रेलिया पुन्हा टी-20 रँकिंगमध्ये बनली किंग)
1. डेविड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद)
हैदराबादचा सलामी फलंदाज वॉर्नरने मागील काही हंगामात उढावदार कामगिरी बजावली आहे आणि यंदाची त्यांच्याकडून अशीच अपेक्षा असेल. पण, इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत मात्र त्याने निराश केले. पहिल्या सामन्यात वॉर्नरने 58 धावा केल्या तरी दुसऱ्या सामन्यात त्याला फॉर्म कायम ठेवता आले नाही आणि एकही धाव न करता बाद झाला. वॉर्नर दरवर्षीप्रमाणे हैदराबादकडून डावाची सुरुवात करेल त्यामुळे त्याचा फॉर्म या आयपीएल फ्रँचायझीसाठी महत्वाचा असणार आहे.
2. स्टिव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स)
मागील वर्षी आयपीएल न खेळेल स्मिथ यंदा राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराच्या रूपात परतणार आहे. स्मिथ सध्या स्तिथीत सर्वोत्कृष्ट फलंदाज मानला जातो, परंतु इंग्लंडचा टी-20 दौरा त्याच्यासाठी खराब सिद्ध झाला. स्मिथने पहिल्या टी-20 सामान्यात 17 धावा, दुसर्या टी-20 सामन्यात त्याच्या फलंदाजीतून केवळ 11 धावा आल्या. तर नुकत्याच संपुष्टात आलेल्या तिसऱ्या सामन्यात त्याने 3 धावा केल्या. अशा प्रकारे त्याने 3 सामन्यांत केवळ 31 धावा केल्या आहेत. स्मिथ असा फॉर्म राजस्थान टीमसाठी चिंतेची बाब सिद्ध होत आहे.
3. इयन मॉर्गन (कोलकाता नाईट रायडर्स)
इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयन मॉर्गनला देखील या मालिकेत फलंदाज म्हणून यशस्वी कामगिरी करता आली नाही. पहिल्या टी-20 सामन्यात मॉर्गनने 5 धावा, तर दुसर्या टी-20 सामन्यात मॉर्गन केवळ 7 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवाय, या सामन्यात त्याच्या अंगठ्यालाही दुखापत झाली. मॉर्गन आयपीएलमध्ये यंदा केकेआरकडून खेळणार आहे आणि तो मॅच फिनिशरच्या भूमिका दिसणे अपेक्षित आहे, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेनंतर तो मॅच फिनिशरची कामगिरी चांगल्या प्रकारे पार पाडेल की नाही या विचारात सध्या नाईट रायडर्स असतील.
4. जॉनी बेअरस्टो (सनरायझर्स हैदराबाद)
हैदराबादचा दुसरा सलामी फलंदाज बेअरस्टोने देखील यंदा टी-20 मालिकेत निराश केले. इंग्लंडचा हा फलंदाज मालिकेत एकदाही दुहेरी आकडा स्पर्श करू शकला नाही. बेअरस्टोने अनुक्रमे 8, 9 आणि अखेरच्या सामान्य 44 चेंडूत 55 धावा केल्या. बेअरस्टोने वॉर्नरसोबत हैदराबादकडून आयपीएलमध्ये डावाची सुरुवात करेल, पण त्यांचे दोन्ही सलामी फलंदाजांचा खराब फॉर्म सनरायझर्ससाठी चिंतेचा विषय बनला आहे.
5. अॅलेक्स कॅरी (दिल्ली कॅपिटल्स)
ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर-फलंदाज अॅलेक्स कॅरी आयपीएलमध्ये यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. अन्य ऑस्ट्रेलियाई खेळाडूंप्रमाणे कॅरीसाठी देखील इंग्लंडचा टी-20 दौरा निराशाजनक ठरला. पहिल्या टी-20 सामन्यात तो फक्त 1 धावा करुन बाद झाला, तर दुसर्या सामन्यात त्याच्या बॅटमधून केवळ 2 धावा आल्या. आणि अखेरच्या सामन्यात त्याच्या जागी मॅथ्यू वेडला संधी मिळाली.