इंग्लंड-ऑस्ट्रेलिया 3rd टी-20 (Photo Credit: Twitter/ICC)

टी-20 मालिकेच्या तिसर्‍या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडचा (England) 5 विकेटने पराभव केला आणि क्लीन स्वीप टाळला. इंग्लंडने पहिले दोन सामने जिंकल्यावर क्लीन स्वीप टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियासाठी हा सामना जिंकणे महत्वाचे होते. या विजयासह ऑस्ट्रेलिया पुन्हा एका टी-20 चा राजा बनला इंग्लंडविरुद्ध विजयसह ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत (T20I Rankings) पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. साऊथॅम्प्टन येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून इंग्लंडला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 146 धावांचे लक्ष्य दिले होते, जे विजयी संघाने 5 विकेट राखून गाठले. इंग्लंडकडून आदिल रशीदने 3 विकेट घेतल्या. दरम्यान, सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असला तरी इंग्लंडने सुरुवातीला दोन सामने जिंकल्याने यजमान टीमने 3 सामन्यांची मालिका मालिका 2-1 अशी जिंकली. (ENG vs AUS 3rd T20: दुसरा टी-20 सामन्यात विजयासह इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या रेटिंगची केली बरोबरी, तिसऱ्या सामन्यात विजयी संघ बनणार नंबर 1 टी-20 टीम)

दरम्यान, डायनॅमिक सलामी,फलंदाज डेविड वॉर्नरला विश्रांती दिली असतानाही ऑस्ट्रेलियाने 146 धावांचे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाच्या विजयात मिशेल मार्शने (Mitchell Marsh) विशेष भूमिका बजावली. 146 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा पहिले 70-1 असा होता, पण त्यांनी पुढील 17 धावांवर तीन विकेट गमावल्या आणि स्कोर 87-4 असा झाला. त्यानंतर मार्शसह अ‍ॅश्टन अगरने (Ashton Agar) ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेले. मार्शने नाबाद 39 तर अगरने नाबाद 16 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने 3 बॉल शिल्लक असताना विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची मधल्याफाळीने पुन्हा एकदा निराश केले. ग्लेन मॅक्सवेलने 6 तर माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ 3 धावा करून बाद झाले.

यजमान इंग्लंडने साऊथॅम्प्टन येथील पहिला टी-20 धावा 2 धावांनी तर दुसर्‍या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरा सामना जिंकून इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या गुणांची बरोबरी केली होती. दुसरीकडे, वनडे विश्वविजेते इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आता शुक्रवारपासून सुरू होणार्‍या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी मँचेस्टरला रवाना होतील.