इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात साउथॅम्प्टन येथे 3 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा टी-20 सामना खेळला जाईल. इंग्लंडने रविवारी झालेल्या दुसर्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. जोस बटलरने (Jos Buttler) आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 77 धावांचा डाव खेळला. या विजयासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (ICC) टी-20 रेटिंगमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या गुणांची बरोबरी केली. दोन्ही टीमचे आता 21 सामन्यात 273 गुण आहेत. आता मंगळवारी, 8 सप्टेंबर रोजी टीम संघ अंतिम टी-20 सामन्यात येतील. ऑस्ट्रेलियाने मालिका गमावली असली तरी क्लीन-स्वीप टाळण्यावर त्यांचे लक्ष असेल, मात्र अजून एक गोष्टीवर दोन्ही टीमच्या नजरा असतील आणि ती म्हणजे आयसीसी टी-20 रँकिंगमधील अव्वल स्थान. (ENG vs AUS 2nd T20: जोस बटलरच्या नाबाद अर्धशतकाने इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने मात, मालिकेतही 2-0 ने विजयी आघाडी)
साउथॅम्प्टन येथील तिसरा सामना गमावलास ऑस्ट्रेलियाला टीम रँकिंगमधील अव्वल स्थान देखील गमवावे लागेल. पहिल्या दोन टी-20 मध्ये विजयानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या टी-20 रेटिंगची बरोबरी साधली आहे. अंतिम सामना जिंकणारा संघ प्रथम क्रमांकाचा दावेदार ठरेल.
Following wins in the first two #ENGvAUS T20Is, England have drawn level with Australia's rating points on the @MRFWorldwide ICC T20I Team rankings 🙌
The team that wins the final match will claim the No.1 spot 👀
Lastest rankings 👉 https://t.co/AeaYDWqlfh pic.twitter.com/kqOo3RbftS
— ICC (@ICC) September 7, 2020
दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे तर पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 7 बाद 157 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलरने डावाची सुरुवात करून नाबाद 77 धावा ठोकल्या आणि तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडचा नियमित सलामी फलंदाज जेसन रॉयला दुखापत झाल्यावर बटलरला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर शून्यावर बाद झाला. अलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथदेखील एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. नंतर मार्कस स्टोइनिस आणि कर्णधार आरोन फिंचने डाव सांभाळला. फिंचने सर्वाधिक 40 धावा केल्या तर स्टोइनिस 35 धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल आणि अश्टन अगारने ऑस्ट्रेलियाला चांगली धावसंख्या गाठून देण्यास मदत केली, पण अखेर विजयासाठी ती धावसंख्या अपुरी पडली.