IPL 2020: आयपीएलमध्ये एकही षटकार नाही मारु शकले 'हे' 3 फलंदाज, पहिले नाव जाणून बसेल धक्का
IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) 2020 हंगाम आता त्यांच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये धडक मारली असून त्यांना दुसऱ्या टीमची प्रतीक्षा आहे. आयपीएल चाहत्यांना दरवर्षीप्रमाणे थरारक आणि रंगतदार सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलच्या (IPL) 13व्या सत्रात मैदानावरील कामगिरी खेळाडूंनी निराश केले नाही. सामन्यादरम्यान खेळाडूंनी चौकार-षटकारांची बरसात केली, तर काही असे खेळाडू देखील आहेत ज्यांना बॅटने यंदा एकही षटकार लगावता आला नाही. विशेष म्हणजे या खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या फलंदाजांचा समावेश आहे. अशा स्थतीत आपण पाहूया असे तीन फलंदाज ज्यांना यंदाच्या हंगामात एकही षटकार लगावता आला नाही. (IPL 2020 Controversial Umpiring Decisions: आयपीएल13 मधील अंपायरांचे 'हे' निर्णय ठरले वादग्रस्त, पाहून तुमच्याही भुवया उंचावतील, पाहा Videos)

1. ग्लेन मॅक्सवेल

यंदाच्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला एकही षटकार मारता आला नाही. या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून त्याने 13 सामने खेळले आणि 11 डावांमध्ये 15.42 च्या सरासरीने 108 धावा केल्या. यावेळी त्याने 9 चौकार मारले परंतु तो एकही षटकार ठोकू शकला नाही. आयपीएल 2020 मध्ये मॅक्सवेलची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 32 धावांची राहिली.

2. केदार जाधव

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवसाठी देखील यंदाचा हंगाम काही खास राहिला नाही. चेन्नई सुपर किंग्ससाठी अलीकडेच्या सामन्यात त्याला खराब कामगिरीमुळे प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर रहावे लागले. जाधवने 13व्या हंगामात सीएसकेसाठी आठ समाने खेळले आणि 20.66च्या सरासरीने एकूण 62 धावा केल्या.

3. श्रेयस गोपाल

राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपाळने आपल्या संघासाठी 14 सामने खेळताना 14 डावांमध्ये एकूण 10 गडी बाद केले. या दरम्यान त्याने बड्या खेळाडूंना पॅव्हिलियनचा मार्गही दाखविला, पण फलंदाजीने तो काही कमाल करू शकला नाही आणि पाच डावात 37 धावाच करू शकला. या दरम्यान गोपालने एकूण तीन चौकार मारले, पण या हंगामात तो एकही षटकार ठोकू शकला नाही.

या खेळाडूंखेरीज या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मधल्या फळीतील फलंदाज गुरकीरत सिंह  मान, सरफराज खान, एन जगदीशन, मुरली विजय, क्रिस जॉर्डन आणि नॅथन कोल्टर-नाईल सारखे मोठे खेळाडूही षटकार मारण्यात अपयशी ठरले आहेत.