IPL 2020: कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल 13 सुरू होण्याची प्रतीक्षा, इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दर्शवला उत्साह (See Post)
कोलकाता नाइट रायडर्स |File image |(Photo Credits: IANS)

इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी 19 सप्टेंबर पासून आयपीएलला (IPL) सुरुवात होण्याची घोषणा केल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पण खरं तर फक्त चाहतेच नाही तर आयपीएल फ्रँचायझी देखील आगामी हंगामाबाबत उत्सुक आहेत आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे ते व्यक्त करत आहेत. दोन वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकणारे कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) फ्रँचायझीने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपली उत्सुकता व्यक्त केली. केकेआरच्या (KKR) या खास पोस्टमध्ये टीमचा कर्णधार दिनेश कार्तिक, वेस्ट इंडिज अष्टपैलू आंद्रे रसेल, अनुभवी फिरकी गोलंदाज सुनील नरेन आणि युवा शुभमन गिल दिसत आहे. आयपीएल यंदा 29 मार्च पासून सुरु होणार होते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते पुढे ढकलण्यात आले. (IPL 2020 Update: क्रिस गेल आयपीएलच्या सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघात होणार सामील? पाहा कसे)

गेल्या वर्षीच्या सामन्यांमधील खेळाडूंचे फोटो केकेआरने पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये नाइट रायडर्सने लिहिले की, “टीव्हीच्या पडद्यावर ही अभिव्यक्ती परत पाहण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.”

केकेआरची नवीन इन्स्टाग्राम पोस्ट पाहा:

दरम्यान, नाईट रायडर्सने त्यांच्या आधीच्या एका पोस्टमध्ये आंद्रे रसेल आणि कमलेश नगरकोटीच्या नेटमध्ये गोलंदाजीची क्लिप पोस्ट केली आहेत. इतर फ्रॅन्चायझीप्रमाणेच केकेआरचे खेळाडू आगामी हंगामाच्या तयारीसाठी ऑगस्टच्या मध्यात दुबईमध्ये दाखल होतील. आयपीएल 2019 मध्ये नाईट रायडर्स प्ले-ऑफसाठी पात्र ठरण्यास अपयशी ठरला आणि 14 सामन्यांमधून सहा विजयांसह पाचव्या स्थानावर राहिला. दुसरीकडे, येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार असून यात स्पर्धेचे वेळापत्रक, SOP आणि अन्य गोष्टींवर चर्चा केली जाईल.