IND vs AFG 3rd T20 Live Streaming: टी-20 विश्वचषकापूर्वी भारताचा शेवटचा T20 सामना, कर्णधार रोहित शर्मा आज कोणते पर्याय आजमावणार? जाणून घेण्यासाठी येथे पाहा सामना
IND vs AFG (Photo Credit - Twitter)

IND vs AFG 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील टी-20 मालिकेतील (T20I Series) तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मालिकेच्या दृष्टीने या सामन्याला महत्त्व नाही. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली. मात्र, हा सामना जिंकून अफगाणिस्तानचा सफाया करण्याचा टीम इंडियाचा (Team India) प्रयत्न असेल. त्याचबरोबर अफगाण संघाला विजयासह मालिका संपवायची आहे. अफगाणिस्तान अजूनही कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचा हा शेवटचा टी-20 सामना आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार रोहित यांना त्यांचे सर्व पर्याय आजमावायचे आहेत. अक्षर पटेल, जितेश शर्मा आणि मुकेश कुमार या खेळाडूंना या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. त्यांच्या जागी संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि आवेश खान या खेळाडूंना आजमावले जाऊ शकते.

कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह?

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.00 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 6.30 वाजता टॉस होईल. तसेच, सामना स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. येथे तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकता. डीडी फ्री डिश वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर सामना विनामूल्य पाहू शकतात. तुम्ही जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-20 सामना ऑनलाइन पाहू शकता. (हे देखील वाचा: NZ vs PAK 3rd T20 2024: न्यूझीलंडने तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव करत मालिका जिंकली)

दोन्ही सघांची संभाव्य प्लेइंग 11

भारत: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा/संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल/कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार/आवेश खान.

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.