एमएस धोनीच्या 'बालिदान बॅज' ग्लोव्हजवर आक्षेप… पण ‘Black Lives Matter’ चालेल; वेस्ट इंडिज खेळाडूंच्या जर्सीवर ICC वर संतापले नेटकरी
जेसन होल्डर, एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे ठप्प झालेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट 8 जुलै पासून पुन्हा सुरु होणार आहे. 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड (England)-वेस्ट इंडिज (West Indies) टीम आमने-सामने येतील. या मालिकेसाठी विंडीज खेळाडू जर्सीवर 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' (Black Lives Matter) लोगो लावून खेळतील. आयसीसीने (ICC) राजकीय वाद आणि वर्णद्वेषाबाबत क्रीडांगणावर काही करण्याची परवानगी देण्याची ही क्रिकेट इतिहासातील पहिलीच वेळ असेल. सोमवारी आयसीसीने विंडीज खेळाडूंच्या आगामी कसोटी मालिकेतील ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ लोगो दाखवला. यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) 2019 वर्ल्ड कपमधील एक वाद पुन्हा एकदा समोर आला. धोनीने स्पर्धेत ग्लोव्हजवर 'बालिदान बॅज' (Balidan Badge) परिधान केले होते, जे राजकीय किंवा धार्मिक विधानांना परवानगी देत नाही असे सांगून आयसीसीने ते काढून काढण्यास भाग पडले होते. या मुद्द्यावरून भारतीय चाहत्यांनी आयसीसीवर संताप व्यक्त केला. (एमएस धोनी बनला शेतकरी, रांची फार्महाऊसमध्ये CSK कर्णधार करतोय सेंद्रिय खताची शेती, पाहा हा व्हायरल व्हिडिओ)

2019 च्या क्रिकेट विश्वचषकात धोनीने विकेटकिपिंग दरम्यान 'बालिदान बॅज' परिधान केले होते जो पॅराट्रुपरचा इन्सिग्निया आहे. धोनीने आपल्या ग्लोव्ह्जवर जो बॅज लावला होता तो फक्त पॅराट्रूपरच लावू शकतो आणि त्याने आपल्या ग्लोव्हजवर बॅज लावून भारतीय सैन्याबद्दल आदर दाखविला.

वेस्ट इंडिज खेळाडूंच्या 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' लोगोवर भारतीय यूजर्सच्या प्रतिक्रिया:

ढोंगीपणा?

हा भेदभाव का

ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर लोगोला परवानगी

राजकीय मुद्द्यांना ग्राउंडमध्ये परवानगी का?

भारतीय सैन्य जीवन मॅटर करत नाही?

आयसीसी आता ब्लॉक करत आहे...

आफ्रिकन-अमेरिकन लोकांवरील जातीय भेदभाव आणि पोलिसांच्या क्रूरपणाविरूद्ध ब्लॅक लाइव्ह्स मॅटर जगातील बर्‍याच देशांमध्ये संघटित चळवळ आहे. 2013 मध्ये ट्रीव्हन मार्टिनच्या मारेकऱ्याला सोडण्याच्या निषेधार्त याची स्थापना केली गेली होती. मिनियापोलिस पोलिसांकडून झालेल्या आफ्रिकन-अमेरिकन व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' चळवळीने जगभरात पुन्हा आपले पाय पसरवले आहे.