एमएस धोनी बनला शेतकरी (Photo Credits: Instagram and CSK/Twitter)

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट स्पर्धा ठप्प झाल्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आपल्या कुटुंबासोबत रांची (Ranchi) येथील फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने (CSK) ट्रॅक्टर चालविताना धोनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आणि आता व्हायरल होत असलेल्या ताज्या व्हिडिओमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज ट्रॅक्टरवर शेत नांगरताना दिसत आहे. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून धोनीच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रसारामुळे इंडियन प्रीमिअर लीग (IPL) अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यावर पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा सोबत धोनी रांची येथील आपल्या फार्महाऊसवर पोहचला आणि लॉकडाऊन पासून तो तेथे स्थायिक आहे. या दरम्यान, धोनीच्या पत्नी साक्षीने भारतीय कर्णधाराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ('Sure I'll See Her Again': जेव्हा पापा एमएस धोनी याने बेशुद्ध पक्ष्याला दिले जीवदान, लेक जीवाने सांगितली कहाणी)

दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सीएसकेचा कर्णधार ट्रॅक्टरच्या मदतीने जमीन कस्तान दिसत आहे. धोनीला ट्रॅक्टरची सवारी आवडलेली आहे असे दिसून येते आणि त्याला व्हिडिओमध्ये आणखी एक फेरी असे बोलताना ऐकले जाऊ शकते. पाहा हा व्हायरल व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Exclusive Video Of Mahi Bhaiya Enjoying Doing Organic Farming !! ❤

A post shared by MS Dhoni Fans Club (@dhoni.bhakt) on

दुसरीकडे, धोनी जून 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता. सामन्यात भारताच्या पराभवानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतली होती आणि आयपीएलद्वारे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. मात्र, कोरोनामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली आणि धोनीसह त्याच्या चाहत्यांची प्रतीक्षा लांबणीवर गेली. धोनी सोशल मीडियावर अधिक सक्रिय नसला तरी त्याची पत्नी साक्षी वेळोवेळी त्याचे फोटो, व्हिडिओ शेअर करून चाहत्यानां त्याची एक झलक देत असते. दरम्यान, 7 जुलै रोजी धोनी आपल्या 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्यासाठी त्याचे चाहते आतापासूनच तयारीला लागले आहे.