India vs New Zealand 1st ODI: एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सलामी, न्युझिलंडवर 8 विकेटनी मात
India Vs New Zealand ODI Series (Photo Credits: Twitter)

India vs New Zealand 1st ODI: भारत विरूद्ध न्युझिलंड एकदिवसीय सामना मालिकेची पहिली मॅच भारताने जिंकली आहे. भारताने न्युझिलंडवर 8 विकेट्सनी मात केली आहे. विजयी सलामी दिल्याने या सीरीजमध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 158 धावांचं लक्ष्य पार करताना भारतीय संघाकडून शिखर धवनने अर्धशतकी खेळी केली आहे. कर्णधार विराट कोहलीने 45 धावा केल्या. तर भारताला विजय मिळवून देताना अंबाती रायडू 13 आणि धवन 75 धावांवर नाबाद राहिला आहे. India vs New Zealand 1st ODI: मोहम्मद शमी ठरला एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज!

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने न्युझिलंडला अवघ्या 157 धावांवर रोखले. या सामन्यात मोहम्मद शमीने खास कामगिरी केली आहे. भारताकडून कुलदीप यादवने 4 तर मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेतील पुढील सामना 26 जानेवारी दिवशी रंगणार आहे.