India vs New Zealand 1st ODI: आजपासून सुरु झालेल्या न्युझीलँड दौऱ्याची भारताने चांगली सुरुवात केली आहे. नाणेफेक हरल्यानंतर भारताला प्रथम गोलंदाजी पत्करावी लागली. मात्र जबरदस्त गोलंदाजी करत भारताने न्युझीलँडच्या 5 खेळाडूंना तंबूत परत पाठवले आहे. ऑस्ट्रेलिया मालिका आपल्या नावावर करत विराटसेना न्युझीलँडमध्ये दाखल झाली आहे. (न्युझिलंड दौर्यामध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत महेंद्रसिंग धोनीला अव्वलस्थानी पोहचण्याची सुवर्णसंधी)
भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीला न्युझीलँडच्या दोन विकेट्स घेण्यात यश आले आहे. याबरोबरच शमीने 100 विकेट्सचा रेकॉर्ड केला आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा मोहम्मद शमी हा जलद गोलंदाज बनला आहे. शमीची हा 56 वा सामना आहे.
100 ODI wickets and counting for @MdShami11 #TeamIndia #NZvIND pic.twitter.com/3RVvthg1CH
— BCCI (@BCCI) January 23, 2019
मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणाऱ्या संघात दोन बदल करण्यात आले होते. दिनेश कार्तिकच्या जागी अंबाती रायडूला संघात स्थान देण्यात आले होते. तर रविंद्र जडेजाऐवजी कुलदीप यादवला संघात सहभागी करुन घेण्यात आले होते.