न्युझिलंड दौर्‍यामध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत महेंद्रसिंग धोनीला अव्वलस्थानी पोहचण्याची सुवर्णसंधी
Mahendra Singh Dhoni. (Photo Credits: Indian Cricket Team/Facebook)

INDIA TOUR OF NEW ZEALAND 2019: ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेट संघाने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आता भारतीय संघ न्युझिलंडमध्ये दाखल झाला आहे. न्युझिलंडमध्ये भारत एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 23 जानेवारीपासून सुरू होणार्‍या एकदिवसीय मालिकेमध्ये 5 सामने (ODIs) रंगतील. नेपियारमध्ये पहिला सामना होणार आहे.  ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये फिनीशर ठरलेला महेद्रसिंग धोनी (MS Dhoni)  याची कामगिरी पाहता न्युझिलंड दौर्‍यामध्ये त्याच्याकडे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवागचा (Virendra Sehwag)  विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे.

महेंद्रसिंग धोनी मोडणार का सचिन तेंडुलकरचा विक्रम ?

न्युझिलंड दौर्‍यामध्येही महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म उत्तम राहिल्यास त्याला सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विशेष रेकॉर्ड मोडण्याची संधी मिळणार आहे. सचिन तेंडुलकरने न्युझिलंड विरूद्ध त्यांच्याच देशामध्ये 18 सामन्यांमध्ये 652 धावा बनवल्या आहेत तर सेहवागने 12 मॅचेसमध्ये 598 धावा बनवल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीला या दोन्ही दिग्गजांचा रेकॉर्ड मोडत अव्वलस्थानी पोहचण्याची सुवर्णसंधी आहे.  भारतीय क्रिकेटपटूंच्या ऑस्ट्रेलियातील विजयी कामगिरीवर लता मंगेशकर यांच्या सुरेल शुभेच्छा, MS Dhoni चं केलं खास कौतुक

न्युझिलंडमध्ये कसा आहे महेंद्रसिंग धोनीचा परफॉर्मन्स?

न्युझिलंडमध्ये धोनी यापूर्वीदेखील उत्तम खेळला आहे. 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 90.16 च्या सरासरीने त्याने 541 धावा केल्या आहेत. 2009साली पहिल्यांदा न्युझिलंडच्या दौर्‍यावर

गेलेल्या धोनीने तीन वेळेस अर्धशतक झळकावलं आहे. भारत - न्युझिलंड एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये तो तिसरा भारतीय फलंदाज आहे. Indian Cricket Team 2019 Schedule: नव्या वर्षात कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक?

न्युझिलंडमध्ये भारत पहिल्यांदा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली वन डे सीरीज जिंकला होता. 34 सामन्यांपैकी आशियाई संघ केवळ 10 सामने जिंकू शकला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ न्युझिलंडमध्ये काय किमया करणार हे क्रिकेटप्रेमींसाठी उत्सुकतेचे आहे.