Indian Cricket Team 2019 schedule: 2018 या वर्षामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि सेनेने दमदार कामगिरी केली आहे. परदेशात जाऊनही भारतीय संघाने प्रतिस्पर्धींना चॅलेंज केले आहे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहे. नव्या वर्षा भारतीय संघ 9 कसोटी सामने (Test Matches) , अंदाजे 31 एकदिवसीय (ODI) सामने (वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहचल्यास 33) आणि T20Iचे 17 सामने खेळण्याची शक्यता आहे. मग पहा नव्या वर्षात कसं असेल भारतीय संघात वेळापत्रक ?
- ऑस्ट्रेलिया दौरा
भारत सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर असल्याने नव्या वर्षात भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्याने भारतीय संघाची सुरूवात होणार आहे.
कसोटी सामना -
3 ते 7 जानेवारी ( सिडनी)
एकदिवसीय सामने -
12 जानेवारी ( सिडनी)
15 जानेवारी (अॅडलेड)
18 जानेवारी ( मेलबर्न)
- न्युझिलंड दौरा
एकदिवसीय सामने
23 जानेवारी (पहिला वन-डे सामना, नेपियर)
26 जानेवारी (दुसरा वन-डे सामना, बे ओव्हल)
28 जानेवारी (तिसरा वन-डे सामना, बे ओव्हल)
31 जानेवारी (चौथा वन-डे सामना, हॅमिल्टन)
3 फेब्रुवारी (पाचवा वन-डे सामना, वेलिंग्टन)
T20I सीरीज
6 फेब्रुवारी (पहिला टी-20 सामना, वेलिंग्टन)
8 फेब्रुवारी (दुसरा टी-20 सामना, ऑकलंड)
10 फेब्रुवारी (तिसरा टी-20 सामना, हॅमिल्टन)
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताच्या दौर्यावर येणार आहे. या दौर्यामध्ये भारतात 5 एकदिवसीय आणि दोन टी 20 सामने रंगणार आहेत.
एकदिवसीय सामने
24 फेब्रुवारी (पहिला वन-डे सामना, मोहाली)
27 फेब्रुवारी (दुसरा वन-डे सामना, हैदराबाद)
2 मार्च (तिसरा वन-डे सामना, नागपूर)
5 मार्च (चौथा वन-डे सामना, दिल्ली)
8 मार्च (पाचवा वन-डे सामना, रांची)
टी 20 सामने
10 मार्च (पहिला टी-20 सामना, बंगळुरु)
13 मार्च (दुसरा टी-20 सामना, विशाखापट्टणम)
- भारत विरूद्ध झिम्बॉम्बे -
भारत विरुद्ध झिम्बॉम्बे सीरीज घोषित झाली असली तरीही त्याच्या तारखांमध्ये अजूनही स्पष्टता नाही. सुमारे 15 वर्षांनंतर भारतामध्ये झिम्बॉम्बे येऊन खेळणार आहे.IPL 2019 सोबत हा दौरा क्लॅश होत असल्याने या सामन्यांच्या तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही. हा सामाना मार्च महिन्याच्या दरम्यान जाहीर केला आहे. वेळेत हा सामना पार पडल्यास महेंद्रसिंग धोनीचा भारतीय खेळाडू म्हणून शेवटचा सामना असेल.
- IPL 2019 –
IPL 2019 यंदा नेमकं कोणत्या दिवसांमध्ये रंगणार आहे. याबाबत कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. मात्र अंदाजे 29 मार्च ते 19 मे या कालावधीमध्ये हे सामने रंगतील. यंदा भारतामध्ये मार्च ते मे या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका रंगण्याची शक्यता असल्याने भारताबाहेर आयपीएलच्या मॅचेस होतील.
- ICC World Cup 2019
यंदा रंगणार्या ICC World Cup 2019 सामन्यांचं यजमानपद इंग्लंड देशामध्ये असेल. 30 मे ते 14 जुलैदरम्यान सामने रंगणार आहेत.
- वेस्ट इंडिज दौरा
वर्ल्डकपनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौर्यावर असेल. या दौऱ्यात भारतीय संघ 2 कसोटी 3 वन-डे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे.
- साऊथ आफ्रिका दौरा
भारताचा साऊथ आफ्रिकेचा दौरा World Test Championships चा एक भाग असणार आहे.
- बांग्लादेश विरुद्ध भारत
बांग्लादेश विरूद्ध भारत ही 2019 या वर्षातील शेवटची कसोटी मालिका असणार आहे. यासाठी बांग्लादेश संघ भारतामध्ये येणार आहे. कसोटीसोबतच 3 टी-20 सामनेदेखील रंगणार आहेत.
- वेस्ट इंडिज विरूद्ध भारत
2019 या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यावर वेस्ट इंडिज संघ भारताच्या दौर्यावर येणार आहे. या दौर्यामध्ये 3 एकदिवसीय, 3 टी 20 सामने रंगणार आहेत.
2019 या वर्षात भारतीय संघ त्यांचा कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला अलविदा म्हणणार आहे. तसेच या वर्षामध्ये क्रिकेट विश्वात मानाचा समजला जाणारा वर्ल्डकप रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी 2019 खूपच खास ठरणार आहे.