India Vs Australia 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना जिंकत भारताने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. रोहीत शर्मा (9), शिखर धवन (23), विराट कोहली (43) धावांचे योगदान दिले. तर दुसऱ्या सामन्याप्रमाणे यंदाही धोनीने बाजी मारली. केदार जाधवने धोनीला उत्तम साथ दिली. चिकाटीने खेळत धोनी 87 धावांवर नाबाद राहिला. तर केदार जाधवने 61 धावा केल्या.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (Melbourne Cricket Ground) वर सुरु असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 231 धावाचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने केवळ 3 विकेट्स गमावत लक्ष्य साध्य केले आणि मालिका आपल्या नावे केली. India Vs Australia 3rd ODI: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय शंकर याला का मिळाले संघात स्थान?