India Vs Australia 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मोठे बदल केले आहेत. अंबानी रायडूच्या स्थानी ऑलराऊंडर केदार जाधवला तर कुलदीप यादवच्या जागी स्पिनर युजवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आले आहे. तर मागील मॅचमध्ये भारतीय संघात डेब्यू करणाऱ्या मोहम्मद सिराजच्या जागी विजय शंकरला संघात पर्दापण करण्याची संधी मिळाली आहे.
ऑलराऊंडर क्रिकेटर विजय शंकर यापूर्वी पाच T20 सामन्यात भारतीय संघाकडून खेळला आहे. या पाच सामन्यात विजय शंकरला तीन विकेट घेण्यात यश आले होते. तर 32 धावांत त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, पाच T20 सामन्यात शंकरने 17 धावा केल्या आहेत. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीचे शानदार शतक; भारताचा 6 गडी राखत विजय
संघातील बदल:
अंबानी रायडू ऐवजी- केदार जाधव
कुलदीप यादव ऐवजी- युजवेंद्र चहल
मोहम्मद सिराज ऐवजी- विजय शंकर
Three changes to our Playing XI for the game #AUSvIND pic.twitter.com/stMWSZ0MYF
— BCCI (@BCCI) January 18, 2019
असा आहे भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल.