IND Vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या दुसरा एकदिवसीय सामना भारताने 6 गडी राखत जिंकला. कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) शानदार शतकाने भारतीय संघाची स्थिती मजबूत केली. 104 धावांवर विराट बाद झाल्यानंतर सर्वांच्या आशा महेंद्रसिंग धोनीवर टिकून होत्या. रंगात आलेला खेळ धोनीने सांभाळला आणि भारताने विजयाला गवसणी घातली. महेंद्रसिंग धोनीने 55 धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने 25 धावा करत धोनीला साथ दिली. याशिवाय रोहित शर्मा (43), शिखर धवन (32), अंबाती रायडू (24) यांनी धावांचे योगदान दिले.
नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलिया संघातील शॉन मार्शने धडाकेबाज शतक केले. 123
चेंडूत त्याने 131 धावांची खेळी केली. यात 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. ग्लॅन मॅक्सवेलचे अर्धशतक थोडक्यात हुकले. 37 चेंडूत त्याने पाच चौकार आणि एक षटकार यांच्यासह 48 धावा केल्या. तर मार्कस स्टोईनिस याने 29 धावांचे योगदान दिले.
भारताच्या भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीला तीन विकेट घेण्यात यश आले. रवींद्र जडेजाने या सामन्यात एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू उस्मान ख्वाजा याला रनआऊट केले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 34 धावांनी पराभव; रोहित शर्माचे शतक व्यर्थ
तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि भारत 1-1 अशा बरोबरीत आहेत.