IND vs AUS 1st ODI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 34 धावांनी पराभव; रोहित शर्माचे शतक व्यर्थ
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे (Photo: Getty Images)

सध्या सिडनी क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) असा वन डे सामना चालू आहे. पहिल्या वनडेमध्ये भारताचा 34 रन्सने पराभव झाला आहे. भारताची असमाधानकारक सुरुवात भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे. नाणेफेक झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आधी बॅटींग करत भारतासमोर 288 रन्सचे टार्गेट दिले. मात्र भारताला 50 ओव्हरमध्ये 254 रन्सच करता आल्या. 3 सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. रोहित शर्माची यामध्ये अतिशय भरीव कामगिरी राहिली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने सातवे शतक ठोकले आहे. रोहित शर्माचे हे 22 वे वनडे शतक होते.

खेळाच्या सुरुवातीला अवघ्या 4 रनवर भारताने 3 विकेट गमावले. त्यानंतर रोहित शर्मा आणि धोनीने भारताचा खेळ सावरला. दोघांनी मिळून 137 रनची पार्टनरशिप केली, त्यानंतर धोनी 51 रनवर बाद झाला. कार्तिक 12 रनवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून पीटर हँड्सकॉम्बने सर्वाधिक 73 रन केल्या. त्यानंतर उस्मान ख्वाजा याने 59 आणि शॉन मार्शने 54 रन्सची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 5 बाद 288 धावा केल्या. यासोबत ऑस्ट्रेलिया संघाचा हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील 1000 वा विजय ठरला.