India Vs Australia 3rd ODI: भारतीय संघाला 231 धावांचं लक्ष्य, एकदिवसीय मालिका जिंकून ऐतिहासिक विक्रम रचण्याची संधी
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: IANS)

India Vs Australia 3rd ODI: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (Melbourne Cricket Ground)वर सुरू आहे. ऑस्ट्रेलियन संघाला आज 48.4  ओव्हर्समध्ये  230 धावांवर गुंडाळण्यामध्ये भारतीय गोलंदाजांना यश मिळालं आहे. आजचा एकदिवसीय सामना अटीतटीचा आहे. सध्या बरोबरीमध्ये असलेल्या दोन्ही संघांंसमोर हा अंतिम सामना जिंकण्याचं लक्ष्य असेल. भारताने हा सामना जिंकल्यास ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका जिंकण्याचा ऐतिहसिक विक्रम रचला जाणार आहे. India Vs Australia 3rd ODI: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय शंकर याला का मिळाले संघात स्थान?

मेलबर्नमध्ये आज सकाळी भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. युझवेंद्र चहलच्या धडाकेबाज गोलंदाजीने भारताने दमदार सुरूवात केली आहे. युझवेंद्र चहलने सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाकडून पिटर हँडस्काँबने अर्धशतक झळकावलं आहे. मात्र इतर खेळाडूंना भारतीय गोलंदाजांनी वेळीच रोखल्याने धावसंख्या 230वर रोखण्यात भारताला यश मिळालं आहे.