भारत (India) आणि यजमान इंग्लंड (England) मधील आयसीसी (ICC) विश्वकप सामान एजबस्टन (Edgbaston) येथे खेळाला जात आहे. इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) ने टीम ला दमदार सुरुवात करून दिली.यजमान देशाचे दोन्ही सलामीवीर भारतीय गोलंदाजांवर भारी पडले. रॉय व बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. त्यानंतर, बेअरस्टोने आपल्या शतकी खेळी ने भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर आपले वर्चस्व राखले. मात्र, रॉय जास्त काळ बेअरस्टोची साथ देऊ शकला नाही आणि 66 धावा करून कुलदीप यादव (Kuldeep Yadav) च्या गोलंदाजी वर बाद झाला. (India vs England, CWC 2019: जॉनी बेअरस्टो चे शतक, जेसन रॉय 66 धावा करत तंबूत)
रॉयल बाद करण्यासाठी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने कमालीचा झेल घेतला. कुलदीपच्या चेंडूवर रॉयने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आणि मोठा शॉट मारण्याच्या नादात झेल बाद झाला. जाडेजा डाव्या बाजूने धावत आला आणि सीमारेषेवर झेल टिपला. जडेजाने टिपलेला झेल पाहून सोशल मीडिया युसर्सकडून त्याचे कौतुक होत आहे. दरम्यान, जडेजा के एल राहुल च्या जागी पर्यायी क्षेत्ररक्षक म्हुणुन मैदानात उतरला होता.
WHAT A CATCH Ravi jadeja terrific Catch....🙏 fist Wicket Jason Roy 66 off 57 @imjadeja @BCCI @ICC @cricketworldcup @imVkohli pic.twitter.com/MfQqDfua7b
— Pavan pavi (@Pavanka43728068) June 30, 2019
when jadeja caught ball that was hit by jason roy
Indian people - pic.twitter.com/cJ922ymCH3
— hsh_do_yaar (@SouravS12633477) June 30, 2019
There’s a reason he’s called “Sir” Jadeja. Top top catch !! Game changer
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) June 30, 2019
Jadeja is the Eklavya of this Indian World Cup Side. #INDvENG
— Gabbbar (@GabbbarSingh) June 30, 2019
Not sure Rahul would have taken that catch. Not sure any other fielder in the Indian team could have taken that. Jadeja... what a fielder... pic.twitter.com/YpvkWxNoTO
— Ashish Magotra (@clutchplay) June 30, 2019
दुसरीकडे, बेअरस्ट्रोचे 90 चेंडूत आपले शतत पूर्ण केले. जेसॉन रॉय बाद झाल्यानंतर सध्या जो रुट आणि बेअरस्ट्रो फलंदाजी करत आहेत. 31.3 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोर आहे 205/1. भारत विरुद्ध सामना जिंकणे इंग्लंडची महत्वाचा आहे. यजमान संघाने शेवटचे दोन सामने गमवले आहेत. त्यामुळे सेमीफायनलच्या दृष्टीने इंग्लंडसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.
इंग्लंडने विश्वकपमध्ये दमदार सुरुवात केली होती. पण श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन सामन्यात पराभव झाल्यामुळे इंग्लंडचे सेमीफायनल मधील स्थान अडचणीत आल आहे. सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी इंग्लंडला आपले सर्व सामने जिंकणं आवश्यक आहे.