आयसीसी (ICC) विश्वकप मध्येआज यजमान इंग्लंड (England) आणि भारत (India) यामध्ये हाय व्होल्टेज सामना होत आहे. इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. तर इंग्लंडला पराभूत करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. या सामन्यात टॉस जिंकत इंग्लंडने पहिले फलंदाजी चा निर्णय घेतला. सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर इंग्लंडच्या दोनी सलामीवीरांनी आपले वर्चस्व राखले. जॉनी बेअरस्ट्रो (Jonny Bairstow) ने आपले शतक पूर्ण केले आहे तर जेसॉन रॉय 56 चेंडूत 66 धावा करत बाद झाला. (IND vs ENG, CWC 2019: विजय शंकर ऐवजी रिषभ पंत ला संधी, फॅन्स ने तिरकस प्रतिक्रियांनी केले अभिवादन)
भारताच्या गोलंदाजांनांविरुद्ध रॉय आणि बेअरस्ट्रोने सावध सुरुवात केली. अद्याप भारतीय गोलंदाजांना सलामीची जोडी तोडण्यात यश आलेले नाही. इंग्लंडने 22 ओव्हरमध्ये 160 धावांचा आकडा पार केला. बेअरस्टो आणि रॉय ने 160 धावांची भागीदारी करत इंग्लंड ला चांगली सुरुवात करून दिली. बेअरस्ट्रोचे हे विश्वकप मधील पहिले शतक आहे.
टीम इंडिया साठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित होईल. तर याउलट इंग्लंडची अवस्था आहे. त्यांनी शेवटचे दोन सामने गमवले आहेत. त्यामुळे सेमीफायनलच्या दृष्टीने इंग्लंडसाठी हा सामना जिंकणे अतिशय महत्त्वाचे आहे. विश्वकप च्या सुरुवातीला इंग्लंड संघ जेतेपदा साठी फेव्हरेट मानला जात होता. इंग्लंडने आपले पहिले 5 पैकी 4 सामन्यात त्यांनी विजय मिळवत विश्वकपमध्ये दमदार सुरुवात केली होती. पण श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दोन सामन्यात पराभव झाल्यामुळे इंग्लंड अडचणीत आला आहे. सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी इंग्लंडला शिल्लक दोनपैकी किमान एका सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे.