(Photo Credit: Twitter)

आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये आज भारत (India)-इंग्लंड (England) संघात महत्वाचा मुकाबला एजबस्टन (Edgbaston) येथे खेळाला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकत यजमान इंग्लंड ने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत सेमीफायनल मध्ये पोहचेल तर सामना हरल्यास इंग्लंड विश्वकपमधून बाहेर पडेल. त्यामुळे इंग्लंडची हा 'करो या मरो' सामना आहे. या सामन्यात भारताने आपल्या प्लेयिंग इलेव्हन मध्ये एक बदल केला आहे. (India vs England, CWC 2019: टीम इंडिया तुम्हाला आमची मदद करावी लागेल! इंग्लंड विरुद्ध मॅचआधी पाकिस्तान च्या शोएब अख्तर ची भारताकडे मागणी)

भारतीय संघात अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) च्या जागी यंग रिषभ पंत (Rishabh Pant) ला संधी देण्यात आली आहे. मागील काही सामने, विजय शंकर ची कामगिरी समाधानकारक नसल्या कारणाने पंत ला संघात स्थान देण्यात आले आहे. टॉस दरम्यान कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने विजय ऐवजी, पंत ला संधी देण्याची घोषणा करताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून येत आहेत.

दरम्यान, विश्वकप च्या सुरुवातीला इंग्लंडला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. त्यांनी पहिल्या 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवत दमदार सुरुवात केली होती. मात्र, श्रीलंका (Sri Lanka) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सलग दोन सामन्यात पराभव झाल्यामुळे इंग्लंड अडचणीत आला आहे. त्यांना सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी शिल्लक सामने जिंकायचे आहे. इंग्लंडने आतापर्यंत 7 सामन्यापैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यात पराभव झाला आहे.