भारत (India)-इंग्लंड (England) विरुद्ध सामना बर्मिंगहॅम (Birmingham) च्या एजबस्टन (Edgbaston) येथे खेळाला जात आहे. दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या उद्देशाने उतरले आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत सेमीफायनलमध्ये पोहचेल तर इंग्लंड संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. भारत वगळता इंग्लंड चा एकच सामना शिल्लक आहे, त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलसाठीची जागा निश्चित करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. दरम्यान, हा सामना पाकिस्तान (Pakistan) साठी देखील महत्वाचा आहे. (ICC World Cup 2019: टीम इंडिया बांगलादेश, श्रीलंका विरुद्ध मुद्दाम हरणार, पाकिस्तानी बसीत अली याचा भारतावर मॅच फिक्सिंगचा आरोप)
टीम इंडिया कडून इंग्लंडचा पराभव झाल्या पाक आणि बांगलादेश च्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा शिल्लक राहतील. त्यामुळे, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) ने भारताकडे मदत मागितली आहे. शोएब ने एका व्हिडिओ द्वारे भारताने इंग्लंडविरुद्ध सामना जिंकावा असे आव्हान केले आहे. शिवाय त्याने सेमीफायनलमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामना व्हावा अशी इच्छाही बोलून दाखवली.
दरम्यान, भारताकडून पराभव झाल्यास इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. सध्या गुणतालिकेत, गत जेता ऑस्ट्रेलिया (Australia) 14 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारत 11 गुणांसह दुसऱ्या तर न्यूझीलंड 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अफगाणस्तान (Afghanistan) विरुद्ध विजयानंतर पाकिस्तानी संघ 9 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. तर यजमान इंग्लंड 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. बांगलादेश (Bangladesh) 7 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.