भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) ने आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये आपले तिसरे शतक ठोकले आहे. भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) सामन्यात रोहित ने 106 चेंडूत शतक साजरे केले. सध्या, रोहित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या बरोबर इंग्लंड गोलंदाजांना चांगलंच झोडपूण काढल. रोहित शर्मा च्या साथीने कर्णधार विराट कोहली तुफान फटकेबाजी केली. पण कोहली 76 चेंडूत 66 धावा करत बाद झाला. सध्या रोहित आणि यांग रिषभ पंत (Rishabh Pant) खेळत आहेत. रोहित ने आपल्या खेळीची स्लो सुरुवात केली पण नंतर त्यांचे गियर बदलले आणि एक अद्भुत फलंदाजी केली. आपल्या खेळीत रोहितने अनेक शानदार शॉट्स लावले. दरम्यान, रोहितला दुसऱ्या ओव्हरमध्ये जीवदान मिळाले होते. ज़ोफ्रा आर्चर च्या चेंडूवर जो रूट ने स्लिपमध्ये त्याचा झेल सोडला होता. (IND vs ENG, ICC World Cup 2019: इंग्लंड विरुद्ध विराट कोहली-रोहित शर्मा च्या जोडीने केली सचिन-सेहवागची बरोबरी, बनवला हा अद्भुत रेकॉर्ड)
टीम इंडियासाठी सर्वाधिक वनडेमध्ये शतकं झळकावण्याचा पराक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) च्या (49) नावावर आहे. दुसरा नंबर लागतो, कर्णधार कोहलीचा. 'रन मशीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटनं 41 शतकं ठोकली आहेत. या यादीत 25 शतकांसह रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. यंदाच्या विश्वकपमध्ये रोहितने दोन शतक आणि एक अर्ध शतक मारले आहेत.
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध इंग्लंडचे सलामीवीर, जेसन रॉय (Jason Roy) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow), आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) च्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. टीम इंडिया चा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) ने यावेळी भेदक मारा केला. शमीने या सामन्यात पाच बळी मिळवत इंग्लंडच्या धावसंख्येवर दबाव आणण्याचे काम चोख बजावले. इंग्लंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत भारतापुढे 338 धावांचे आव्हान ठवले. विश्वकपमध्ये भारत हा एकमेव अपराजित संघ आहे. टीम इंडिया ने सहा पैकी 5 सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला.