(Image Credit: AP/PTI Photo)

भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) रेकॉर्ड चा बादशाह बनला आहे. क्रिकेट विश्वात असा कोणताही विक्रम नाही ज्यावर कोहलीचे नाव नाही. यंदाच्या आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये इंग्लंडविरुद्ध संयत सामन्यात रोहित (Rohit Sharma)-विराट कोहली (Virat Kohli) ने वीरेंदर सेहवाग (Virender Sehwag) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा एक विक्रम मोडला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सेहवाग आणि सचिनच्या जोडी अधिक काळ लक्षात राहण्यासारखी आहे. एकत्रितपणे, या दोन खेळाडूंनी इतके रेकॉर्ड केले आहेत की चाहते ते विसरू शकत नाहीत. पण आता, रोहित आणि विराटची जोडी सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धम्माल करत आहे. (IND vs ENG, ICC World Cup 2019: युजवेंद्र चहल ने मोडला 16 वर्षांपूर्वीचा नकोसा रेकॉर्ड, इंग्लंड विरुद्ध दिल्या इतक्या धावा)

विश्वकपच्या भारत विरुद्ध इंग्लंड (England) सामन्यादरम्यान, रोहित आणि विराटच्या जोडीने वनडे क्रिकेटमध्ये 31 वेळा 50 धावांची भागीदारी रचत सचिन आणि सेहवागच्या या रेकॉर्ड ची बरोबरी केली आहे. या यादीत 55 अर्धशतक साजरे करून सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिनची जोडी अव्वल स्थानावर आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करत इंग्लंडने भारतासमोर जिंकण्यासाठी 338 धावांचे मोठे आव्हान दिले आहेत. इंग्लंडसाठी सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy), जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) ने सर्वाधिक धावा केल्या. 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर के. एल राहुल (KL Rahul) शून्यावर बाद झाला. रोहितच्या साथीने कर्णधार कोहलीने तुफान फटकेबाजी केली. पण कोहली 76 चेंडूत 66 धावा करत बाद झाला. सध्या रोहित आणि यांग रिषभ पंत (Rishabh Pant) खेळत आहेत. विश्वकपमध्ये भारत हा एकमेव अपराजित संघ आहे. टीम इंडिया ने सहा पैकी 5 सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला.