भारत-बांग्लादेश (Photo Credits: Getty Images)  

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघ पुन्हा एकदा टी-20 मालिकेसाठी आमने सामने येण्यास सज्ज आहे. दोन्ही संघातील दुसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर (Saurashtra Cricket Stadium) खेळला जाणार आहे. पण, या सामन्यावर चक्रीवादळाचे संकट बनले आहेत. 'महा' (Maha) नावाचे चक्रीवादळ गुजरातच्या गुजरात किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे याचा भारत-बांग्लादेशमधील मॅचवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. या चक्रीवादळामुळे राजकोटसह गुजरातमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 नोव्हेंबरला सरासरीपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मालिकेतील पहिला सामन्यात बांग्लादेशने अष्टपैलू खेळी केली आणि 7 विकेटने विजय मिळवला. दिल्लीतील भीषण वायू प्रदूषणादरम्यान पहिला टी-20 सामना खेळला गेला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वायू प्रदूषणाने प्रभावित राहिला. (भारत-बांग्लादेश दुसऱ्या टी-20 मॅचचं लाईव्ह स्कोरकार्ड तुम्ही इथे पाहू शकता)

दुसऱ्या टी-20 मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स (Star Sports) 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी इंग्रजी कॉमेंट्रीमध्ये आणि स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी हिंदी भाषामध्ये पाहता येईल. शिवाय, लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टार (Hotstar) वर उपलब्ध असेल. शिवाय तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण आमच्या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता.

पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताला 7 विकेट्सने पराभूत करून मालिकेतील आपली 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघा (Indian Team) साठी या मालिकेत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. हे सामना गमावला तर संघ मालिकाही गमावलं. यानंतर तिसरा सामना नागपुरात होणार आहे. राजकोटमधील सामन्यादरम्यान सर्वांच्या नजारा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर असेल. मापहिल्या सामन्यात रोहितने फक्त 9 धावा केल्या होत्या. त्यामुळे, यंदाच्या मॅचमध्ये रोहित प्रभावी खेळी करण्याच्या प्रयत्नात असेल. शिवाय, मधली फळी कसा खेळ करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.  भारताची मधली फळी संघासाठी एक मोठी डोकेदुखी बनली आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा एकदा प्रभाव पाडण्यात अपयशी राहिला. त्यामुळे, त्याच्या जागी संजू सॅमसन याला संधी दिली जाते की पंतला संघात कायम ठेवले जाते हे पाहणे गरजेचे असेल.