IND vs AUS (Photo Credit - Twitter)

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (IND vs AUS) आता वनडे मालिकेत भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांमधील वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही संघात सर्वात मोठा बदल कर्णधारांमध्ये झाला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या सामन्यात उपस्थित राहणार नाही, अशा परिस्थितीत संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे, अशा स्थितीत कांगारू संघाची कमान स्टीव्ह स्मिथच्या हाती असेल. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा हार्दिक पांड्या वनडेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. हार्दिक पांड्याने आतापर्यंत 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.

दुसरीकडे स्टीव्ह स्मिथ 5 वर्षांनंतर वनडेमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. स्टीव्ह स्मिथ 2014 ते 2018 दरम्यान ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार होता. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या रूपात तीन योग्य वेगवान गोलंदाज आहेत, गरज पडल्यास कर्णधार हार्दिक पंड्याही मध्यमगती करू शकतो. (हे देखील वाचा: IND vs AUS ODI Schedule: कसोटीनंतर आता रोहितची सेना वनडेत कांगारूंविरुद्ध लढणार, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने)

सामना कधी आणि कुठे बघणार?

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. सामन्याचे थेट प्रवाह Disney + Hotstar अॅपवर उपलब्ध असेल.

पहा दोन्ही संघाचे खेळाडू:

टीम इंडिया : इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस सायनिस, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, अॅश्टन आगर, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, शॉन अॅबॉट, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी.