Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका आता संपुष्टात आली आहे. यामध्ये भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला आहे. यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. ही मालिका खूपच रोमांचक असणार आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघ शेवटच्या वेळी ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे, अशा परिस्थितीत स्पर्धा मजबूत असेल. 17 मार्चपासून सुरू होणार्‍या वनडे मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेत प्रथमच रवींद्र जडेजाचा (Ravidra Jadeja) दुखापतीनंतर समावेश करण्यात आला आहे, तर जयदेव उनाडकटला दीर्घकाळासाठी वनडे संघात स्थान मिळाले आहे.

येथे पहा मालिकेचे वेळापत्रक 

3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर, दुसरा सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे आणि तिसरा आणि अंतिम सामना 22 मार्च रोजी चेन्नई येथे खेळवला जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील. (हे देखील वाचा: प्रशिक्षक Rahul Dravid च्या प्रश्नांना Virat Kohli ने दिले मजेशीर उत्तरे, WTC फायनलबाबत सांगितली मोठी गोष्ट, पहा व्हिडिओ)

पहिला वनडे सामना: 17 मार्च - वानखेडे क्रिकेट स्टेडियम, मुंबई

दुसरा वनडे सामना: 19 मार्च – YS राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम

तिसरा वनडे सामना: 22 मार्च, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

पहा दोन्ही संघ

टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर अॅडम झाम्पा