भारतीय संघ (Indian Team) 24 जानेवारीपासून न्यूझीलंडच्या (New Zealand) दौऱ्यावर 5 टी-20, 3 वनडे आणि 2 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यापूर्वी किवी संघाला मोठा धक्का बसला आहे. यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम (Tom Latham) याला 24 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या टेस्ट मालिकेदरम्यान लॅथमच्या बोटाला दुखापत झाली होती ज्यामुळे त्याला आता टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेला मुकावे लागणार आहे. दोन्ही संघात 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान टी-20 मालिका खेळली जाईल. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) देखील भारतविरुद्ध मालिकेसाठी वेळेत फिटनेस परत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. प्रशिक्षक गॅरी स्टिड म्हणाले की, भारतविरुद्ध टी-20 मालिकेत बोल्टच्या खेळण्यावर संभ्रम आहे. "बोल्टच्या उजव्या हाताला फ्रॅक्चरमुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे आणि या आठवड्यात गोलंदाजीला सुरुवात करेल," स्टेडने निवेदनात म्हटले आहे. (न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, पृथ्वी शॉ India A संघाच्या 2 सामन्यांच्या प्रॅक्टिस सामन्यातून बाहेर)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यात मिशेल स्टार्क याचा चेंडू लागल्याने बोल्टच्या हाताला फ्रॅक्चर झाला होता. दुसरीकडे, 27-वर्षीय लॅथमनेला मार्नस लाबूशेनचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात दुखापत झाली होती. न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक्स-रेमध्ये लॅथमच्या बोटाला फ्रॅक्चर असण्याची पुष्टी झाली आहे. उजव्या हाताच्या छोट्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यानंतर आता ठीक होण्यासाठी त्याला सुमारे चार आठवड्यांच्या आवश्यकता आहे.' दरम्यान, बोल्ट आणि लॅथमऐवजी लोकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री यांनाही दुखापत झाली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत 0-3 क्लीन स्वीपनंतर न्यूझीलंड भारतविरुद्ध मालिकेसाठी यजमानपद भूषवलं. भारतविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका 24 जानेवारी रोजी ऑकलंडमध्ये सुरू होईल आणि त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून तीन साम्यांची वनडे मालिका आणि त्यानंतर 21 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामने खेळले जातील.