भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह 5 खेळाडूंनी ऑस्ट्रेलियामधील बायो सिक्युरिटी प्रोटोकॉलचे (Bio-Scurity) उल्लंघन केले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), रिषभ पंत (Rishabh Pant), शुभमन गिल (Shubman Gill) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये हे सर्व जण एका हॉटेलमध्ये खाताना दिसले होते. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर असून खेळाडूंना बायो बबल सोडण्याची परवानगी नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या व्हिडिओची तपासणी करत आहे. यामुळे या पाचही खेळाडूंना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
रोहित शर्मा, रिषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी या खेळाडूंना भारतीय व ऑस्ट्रेलियन संघापासून अलग ठेवण्यात आले आहेत. बायो-प्रोटोकॉलनुसार, या सर्वांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, असे शनिवारी रात्री क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे देखील वाचा- IND vs AUS 3rd Test 2021: हिटमॅन शो! ऑस्ट्रेलियामध्ये अखेर मैदानात उतरला रोहित शर्मा, सिडनी टेस्टपूर्वी नेट्समध्ये केला सराव, पहा व्हिडिओ
ट्विट-
India Test vice-captain Rohit Sharma among those isolated; investigation to determine if it's breach of bio-security protocol: CA
— Press Trust of India (@PTI_News) January 2, 2021
मेलबर्नमधील बीबीक्यू रेस्टॉरंटमध्ये बसून पाच भारतीय खेळाडू जेवताना खाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेस्टॉरंटच्या कर्मचार्यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हॅरार्ड आणि द एज यांना यासंदर्भात माहिती दिली होती. दरम्यान, एका चाहत्याने त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि त्या जोडीला धन्यवाद दिले. तसेच घडलेला प्रकार आणि व्हिडीओ त्या चाहत्याने ट्विट केला होता.