IND vs AUS 3rd Test 2021: हिटमॅन शो! ऑस्ट्रेलियामध्ये अखेर मैदानात उतरला रोहित शर्मा, सिडनी टेस्टपूर्वी नेट्समध्ये केला सराव, पहा व्हिडिओ
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर 7 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या रोहितने कांगारू संघाविरुद्ध आगामी सामन्यापूर्वी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव सुरु केला आहे. बीसीसीआयने नुकतंच त्यांच्या ट्विटर अकाउंटवर रोहितच्या सराव सत्राचा व्हिडिओ शेअर केला.
IND vs AUS 3rd Test 2021: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) 7 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय संघात (Indian Team) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. SCG मधील तिसऱ्या टेस्टपूर्वी भारतीय संघात काही मोठे बदल झाले आहेत. टी नटराजन, शार्दूल ठाकूर यांचा उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांच्या जागी संघात समावेश झाला, तर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) बोर्डाने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. आयपीएल दरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापत झालेल्या रोहितने सिडनीमधील आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आणि संघात सामील झाला आहे. मागीलवर्षी जानेवारी महिन्यानंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या रोहितने कांगारू संघाविरुद्ध आगामी सामन्यापूर्वी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव सुरु केला आहे. बीसीसीआयने नुकतंच त्यांच्या ट्विटर अकाउंटवर रोहितच्या सराव सत्राचा व्हिडिओ शेअर केला. (IND vs AUS Test 2021: भारतीय कसोटी संघात उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी, शार्दूल ठाकूरचाही समावेश)
"प्रतीक्षा संपली! हिटमॅन शो आता उलगडणार आहे," असं लिहीत बीसीएसईने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला. ANIने दिलेल्या माहितीनुसार टीम इंडिया सध्या मेलबर्नमध्ये सराव करत असून सोमवारी सिडनीसाठी रवाना होईल. यापूर्वी, रोहित शर्माने गुरुवारी ऑस्ट्रेलियामधील फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांच्या देखरेखीखाली ऑस्ट्रेलियामधील पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. रोहित प्रशिक्षण घेत असताना, उर्वरित संघाने एमसीजी येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारताच्या शानदार विजयानंतर दोन दिवसांचा थोडक्यात ब्रेक घेतला. 33 वर्षीय मुंबईकर आपल्या पहिल्या सराव सत्रात कॅचिंग प्रॅक्टिस करताना दिसला. पहा रोहितच्या बॅटिंग प्रॅक्टिसचा हा व्हिडिओ:
The wait is over!
The Hitman @ImRo45 show is about to unfold.💥😎 #TeamIndia pic.twitter.com/DdagR1z4BN
— BCCI (@BCCI) January 1, 2021
दरम्यान, खेळाडूंच्या दुखापतीमुळे बॉर्डरने नुकतंच सुधारित संघाची घोषणा केली. ज्यानुसार, नटराजन आणि शार्दूल ठाकूर यांना कसोटी संघात स्थान मिळाले असून रोहितकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले होते, मात्र रोहितच्या कमबॅकनंतर पुजाराला जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. मेलबर्नमधील दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये 8 विकेटने कांगारू संघाचा धुव्वा उडवत भारताने 1-1 अशी मालिकेत बरोबरी केली. 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जाईल ज्यात भारतीय संघ विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2021 05:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

