Pulwama Terror Attack चा निषेध म्हणून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या T20I सामन्यापूर्वी खेळाडूंची शहीदांना श्रद्धांजली; काळ्या फिती बांधून Team India मैदानात
IndVsAus (Photo Credits: Twitter)

India vs Australia T20I: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulwama Terror Attack) निषेध म्हणून आज भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) हातावर काळ्याफिती बांधून मैदानात उतरला आहे. विशाखापट्टणम येथे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी 20 (T20I) सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ मैदानात आला. त्यांनी शहीदांना आदरांजली म्हणून दोन मिनिटं मौन बाळगले. त्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी विश्वचषकामध्ये पाकिस्तान संघावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. विराट कोहलीने देखील देशभावना जी असेल त्याचा आम्ही आदर राखू आणि बीसीसीआय जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे म्हटले आहे.(ICC Cricket World Cup 2019: पाकिस्तानवर बहिष्कार नको, पराभूत करुन बदला घ्या: सचिन तेंडूलकर )

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये भारतात या दौऱ्यात दोन T20I सामने आणि पाच एकदिवसीय सामने रंगणार आहेत.