पुनम राऊत (Photo Credit: Twitter/ICC)

IND-W vs AUS-W Day/Night Test: भारताच्या पुनम राऊतने (Punam Raut) क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल (Carara Oval) येथे ऐतिहासिक गुलाबी कसोटीच्या (Pink Ball Test) दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या अपीलवर नकार देत मैदानावरील अंपायरने नकार दिल्यानंतरही तिने स्पिरिट ऑफ क्रिकेट (Spirit of Cricket) चर्चेला सुरुवात केली. शुक्रवारी पहिल्या सत्रात सोफी मोलिनेक्सच्या (Sophie Molineux) षटकात यष्टीरक्षकाकडे झेलबाद होण्यापूर्वी पुनमने 165 चेंडूत 36 धावा ठोकल्या. पहिल्यांदा दिवस/रात्र कसोटी सामना खेळणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या संयमाची परीक्षा घेत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्मृती मंधाना आणि पूनम यांनी यजमान संघाच्या गोलंदाजांना भरपूर त्रास दिला. स्मृतीने दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला मिळालेल्या जीवनदानाचा लाभ घेतला आणि आपले पहिले शतक पूर्ण केले. दुसरीकडे पूनम ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर ठामपणे उभी राहिली. मंधाना बाद झाल्यानंतर काही वेळातच पूनमनेही पॅव्हिलियनची वाट धरली. (Smriti Mandhana हिने Pink Ball Test मध्ये झळकावले शतक)

सामन्याच्या पहिल्या दिवशी शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर राऊत क्रीजवर आली. मात्र पूनम राऊत या सामन्यात तिच्या फलंदाजीसाठी नाही तर तिच्या बाद झाल्यामुळे चर्चेचे कारण बनली आहे. पूनमने या सामन्यात खेळ भावनेचे एक नवीन उदाहरण सादर केले, जे पाहून विरोधी संघ आणि पंचही चकित झाले. भारताच्या 80 व्या ओव्हरमध्ये सोफी मॉलिनेक्स गोलंदाजी करण्यासाठी आली. चेंडू बाहेरून जात होता ज्यावर पूनमने ताणून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला पण तो यष्टीरक्षक एलिसा हिलीच्या हातात गेला. मॉलिनेक्सने अपील केले पण पंचाने आउट दिला नाही. ऑस्ट्रेलियासाठी DRS रिव्ह्यू देखील उपलब्ध नव्हता अशा स्थितीत पूनम पॅव्हिलियनच्या दिशेने चालू लागली. तिला जाताना पाहून पंच आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आश्चर्य वाटले. पूनमला कल्पना होती की चेंडू तिच्या बॅटच्या कडेला लागून विकेटकीपरच्या हातात गेला आहे. अंपायरने आपलट निर्णय देऊनही तिने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.

यानंतर डगआउटमध्ये बसलेला भारतीय संघही उभा राहिला आणि तिच्या निर्णयाचा आदर केला. या दरम्यान, भाष्यकाराने देखील हा एक मोठा आणि धाडसी निर्णय असल्याचे म्हटले आहे. पुनम बाद होऊन बाहेर गेली तेव्हा भारताची स्थिती 2 बाद 217 अशी होती. राऊतने दाखवलेल्या प्रामाणिकपणाला क्रिकेट क्षेत्रातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींनी गुलाबी बॉल कसोटीसाठी डीआरएस उपलब्ध नसतानाही बाहेर जाण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित केला, तर काहींनी क्रीडा भावनेसाठी तिची प्रशंसा केली.