भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) ही पहिलीच मालिका आहे. दुखापतीमुळे रोहित दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत KL राहुलने ODI मालिकेचे नेतृत्व केले, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकाने भारताचा 3-0 ने पराभव केला. आता रोहितचे संघात पुनरागमन झाले आहे. रोहित शर्माने पहिल्या एकदिवसीय सामन्याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याच्यासोबत ओपनिंगची सुरुवात कोण करणार सांगितले. केएल राहुल बहिणीच्या लग्नामुळे पहिला वनडे खेळत नाही आहे. त्याचवेळी संघाचे दोन सलामीवीर शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे.
ईशान किशन पहिल्या सामन्यात सलामीला उतरणार
रोहित शर्मा म्हणाला, “इशान किशन वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत सलामी देईल. मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र तो सध्या आयसोलेशनमध्ये असून त्याची क्वारंटाईन अद्याप पूर्ण झालेली नाही. अशा स्थितीत किशन सलामीला सुरुवात करेल. रोहितच्या नेतृत्वाखाली भारत आपला 1000 वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. हा टप्पा गाठणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. (हे ही वाचा Justin Langer Resignation: पाकिस्तान दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचा राजीनामा)
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता