ऑस्ट्रेलियन क्रिकेट (Australia Cricket) संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Justin Langer Resignation) दिला आहे. त्यांच्या व्यवस्थापन कंपनीने शनिवारी ही माहिती दिली. डायनॅमिक स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट ग्रुपने जाहीर केले आहे की जस्टिन लँगर यांनी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या बैठकीनंतर लँगर यांनी शुक्रवारी संध्याकाळी राजीनामा दिला. माजी क्रिकेटपटू जस्टिन लँगर 2018 साली ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक बनले. त्याच्या प्रशिक्षणाखाली ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वचषक आणि ऍशेसमध्ये 4-0 असा विजय मिळवला.
Tweet
Cricket Australia has today accepted the resignation of men's team head coach Justin Langer. pic.twitter.com/BhjrN9kuF3
— Cricket Australia (@CricketAus) February 5, 2022
यापूर्वी, जस्टिन लँगरनेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेली बोनसची ऑफर नाकारली होती कारण क्रिकेट बोर्डाने कोरोनामुळे बर्याच जणांना कामावरून काढून टाकले आहे अशा वेळी तो स्वीकारणे 'नैतिकदृष्ट्या अयोग्य' ठरेल, असे त्यांचे मत होते. जस्टिन लँगरच्या कोचिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर अॅशेसवरही कब्जा केला, त्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाला बोनस दिला जात होता. (हे ही वाचा IPL 2022: पाकिस्तान लीगवर पुन्हा भारी आयपीएल; ‘या’ दिग्गजाने माध्यातूनच सोडली PSL टीमची साथ, जाणून घ्या काय आहे प्रकरण)
पाकिस्तान दौऱ्यापूर्वी लँगर यांनी दिला राजीनामा
ऑस्ट्रेलियन संघाला मार्चमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जायचे आहे. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा 24 वर्षांनंतर होत आहे. अशा परिस्थितीत या ऐतिहासिक दौऱ्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचा राजीनामा ही ऑस्ट्रेलियन संघासाठी चांगली बातमी नाही. जस्टिन लँगरचा क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतचा करार जूनपर्यंत होता. परंतु, त्याचा करार संपण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याने ऑस्ट्रेलियन संघात सर्व काही ठीक नसल्याचे दिसून येत आहे.