अँडी फ्लॉवर (Photo Credit: Twitter/@englandcricket)

IPL 2022 Mega Auction: पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या टी-20 सुपर लीग खेळली जात आहे आणि गतविजेता मुलतान सुलतान (Multan Sultans) या क्षणी जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांनी अजून पराभवाचे तोंड पाहिलेले नाही. पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान संघाचे कर्णधारपद चोख बजावत आहे, मात्र आता या संघाला अचानक धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि झिम्बाब्वेचे माजी फलंदाज अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांनी हंगामाच्या माध्यातूनच संघ सोडला आहे. आणि याचे कारण आयपीएलला (IPL) मानले जात आहे. फ्लॉवर यांनी भारतात काही दिवसातच आयोजित केल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) लिलावात भाग घेण्यासाठी असे केले असल्याचे अहवालात म्हटले जात आहे. क्रिकेट पाकिस्तानने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. (IPL 2022: प्राईस टॅग नव्हे लखनऊ सुपर जायंट्समध्ये KL Rahul वर ‘या’ गोष्टीचे असणार ‘सर्वात मोठे ओझे’, मेंटर गौतम गंभीरने सांगितले)

आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये होणार आहे. या मेगा लिलावासाठी एकूण 1,214 खेळाडूंनी नोंदणी केली होती, ज्यापैकी BCCI ने एकूण 590 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले आहे. बीसीसीआयने निवडलेल्या खेळाडूंपैकी 370 भारतीय तर 220 परदेशी खेळाडू आहेत. उल्लेखनीय म्हणजे फ्लॉवरची नवीन IPL फ्रँचायझी लखनौ सुपर जायंटने आयपीएलच्या आगामी 15 व्या हंगामासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. इंग्लंडचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि देशाचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक फ्लॉवर 2020 आणि 2021 च्या हंगामात पंजाब किंग्जच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. तथापि, सुलतानच्या मीडिया विभागाने पुष्टी केली की फ्लॉवर अक्षरशः उपलब्ध होईल आणि 13 फेब्रुवारीला पाकिस्तानला परत येईल.

दुसरीकडे, 2020 पासून संघाचा कर्णधार असलेल्या केएल राहुलने पंजाब किंग्सची साथ सोडण्याचा निर्णय घेण्याच्या काही दिवसांनी फ्लॉवरने आपला राजीनामा दिला. लक्षात घ्यायचे की राहुल यावर्षीपासून लखनौ फ्रँचायझी संघाचे नेतृत्व करणार आहे. लखनौने लिलावापूर्वी केएल राहुलला आपला कर्णधार बनवले आहे. तर याशिवाय ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस आणि भारताचा युवा लेगस्पिनर रवी बिश्नोई यांचा संघात समावेश केला आहे. तसेच कोचिंग स्टाफमध्ये फ्लॉवरसह मार्गदर्शक म्हणून भारताचे माजी सलामीवीर आणि कोलकाता नाईट रायडर्सचे दोन वेळा आयपीएल विजेता गौतम गंभीर असतील.