KL Rahul (Photo Credit - Twitter)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premire League) तयारी सुरु झाली आहे. या हंगामात 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसतील. यामध्ये लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि गुजरातचा समावेश करण्यात आला आहे. लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) लिलावापूर्वी आपल्या संघाचे आणि केएल राहुलचे कौतुक केले. त्याने केएल राहुलची (KL Rahul) निवड योग्य का सर्वोत्तम निर्णय असल्याचे सांगितले. आयपीएल (IPL) 2022 च्या हंगामात आतापर्यंत राहुलला लखनौ सुपर जायंट्सने सर्वाधिक रुपये देऊन ताफ्यात सामील केले आहे. लखनौने त्याला 17 कोटींमध्ये संघाचा कर्णधार म्हणून खरेदी केले आहे. त्यामुळे अनेकांना वाटते की राहुल लखनौ येथे त्याच्या पहिल्या हंगामात खूप दबावाखाली असू शकतो. तथापि लीगच्या 15 व्या आवृत्तीपूर्वी फ्रँचायझीचा मार्गदर्शक गंभीरला वाटते की किंमत नाही तर कामगिरीचे दडपण या मोसमात राहुलवर ‘सर्वात मोठे ओझे’ असेल. (IPL 2022: लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या लोगोचे अनावरण Watch Video)

“त्याला मोकळे वाटणे हे सपोर्ट स्टाफचे काम आहे. सर्वात मोठा भार प्राईस टॅग नसून कामगिरी करण्याचा दबाव असेल. आम्हाला असे खेळाडू हवे आहेत जे प्रामाणिक आहेत, फ्रँचायझीसाठी खेळायचे आहेत आणि जे या दोन महिन्यांत भारताकडून खेळण्याचा विचार करत नाहीत. भारतासाठी खेळणे हा उप-उत्पादन आहे. आम्हाला लखनौसाठी परफॉर्मन्स हवा आहे,” NDTV ने उद्धृत केल्यानुसार गंभीर म्हणाला. दरम्यान लखनौ सुपर जायंट्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राहुलकडे पंजाब किंग्जसह आयपीएलमध्ये दोन वर्ष कर्णधारपदाचा अनुभव आहे. तथापि, पंजाबचा कर्णधार म्हणून त्याच्या दोन्ही कार्यकाळात राहुल संघाला प्लेऑफची पात्रता मिळवून देण्यात अपयशी ठरला होता. तरीही, एलएसजीचे मालक संजीव गोएंका यांना वाटते की राहुलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात कोणतीही चूक केली नाही.

दुसरीकडे, राहुलसह लखनौ फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियन मार्कस स्टॉइनिस आणि युवा भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोई यांना देखील आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी इतर दोन ड्राफ्ट निवडी म्हणून निवडले होते. आता जेतेपदासाठी आव्हान पेलण्यासाठी लखनौ व्यवस्थापन लिलावात आपला संघ आणखी मजबूत करण्यास उत्सुक असेल. लिलावात संघाची नजर राहुलला एक योग्य सलामी जोडीदार, अनुभवी फिरकीपटू, वेगवान गोलंदाज आणि जबरदस्त अष्टपैलू शोधण्यावर असेल.