
भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघात आज कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना थोड्याच वेळात सुरु होईल. या मॅचमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या मॅचसाठी भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. दीपक चाहर याला दुखापत झाल्याने त्याच्या जागी नवदीप सैनी (Navdeep Saini) याला जागा दिली गेली आहे. सैनीने या मॅचद्वारे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. चेन्नईमधील पहिला वनडे सामना विंडीजने मालिकेत आघाडी घेतली होती, मात्र,विशाखापट्टणममध्ये भारताने दमदार पुनरागमन केले आणि मालिकेत बरोबरी साधली. आता दोन्ही संघ आजच्या या मॅचमध्ये विजय मिळवत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील. एकीकडे, भरती संघ विंडीजविरुद्ध विजयी रथ कायम ठेवण्याच्या निर्धारित असेल, तर दुसरीकडे विंडीज भारतविरुद्ध 2006 नंतर आणि 2002-03 नंतर भारतात खेळताना पहिल्यांदा मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. विंडीज गेल्या दोन्ही वनडेमध्ये फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे, परंतु टीम इंडियाने त्यांच्या फिल्डिंगने निराश केले. (IND vs WI 2nd ODI: विराट कोहली याला मागे टाकत शाई होप दुसऱ्या क्रमांकावर; रोहित शर्मा याने मिळवले अव्वल स्थान)
भारतासाठी आनंदाजी बाब म्हणजे श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत दोन्ही लयीत आले आहे. मधल्या फळीतील दोन्ही फलंदाजांनी मागील दोन्ही सामन्यात शानदार फलंदाजी केली. दरम्यान, जर विंडीजविरुद्ध तिसरा सामना जिंकून भारताने मालिका जिंकण्याचे काम केले तर विंडीजविरुद्धची ही त्यांची सलग दहावी द्विपक्षीय मालिका असेल. आयसीसी क्रमवारीत नवव्या विंडीजने चेन्नईत पहिला सामना 8 विकेटने जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती, पण दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवता जोरदार पुनरागमन केले. वेस्ट इंडीज संघ 17 वर्षानंतर वनडे मालिकेत भारताला हरवू शकेल का हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
असा आहे भारत-वेस्ट इंडिजचा प्लेयिंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नवदीप सैनी, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.
वेस्ट इंडिज: एव्हिन लुईस, शाई होप, शिमरोन हेटमायर, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), जेसन होल्डर, खारी पियरे, रोस्टन चेझ, अलज़ारी जोसेफ, शेल्डन कोटरेल, निकोलस पूरन आणि कीमो पॉल.