IND vs WI 2nd ODI: विराट कोहली याला मागे टाकत शाई होप दुसऱ्या क्रमांकावर; रोहित शर्मा याने मिळवले अव्वल स्थान
शाई होप (Photo Credit: Getty)

भारत (India0 आणि वेस्ट इंडिया (West Indies) संघात विशाखापट्टणम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये भारताने विंडीजला विजयासाठी 388 धावांचे विशाल लक्ष्य दिले आहे. भारतीय संघाकडून सलामीची जोडी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल यांनी तुफान फलंदाजी केली आणि संघाला मजबूत स्थतीत नेले. रोहितने दमदार फलंदाज करत 159 धावांची तुफान बॅटिंग केली. यादरम्यान, हिटमॅनने राहुलच्या साथीने पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड भागीदारी रचली. रोहितने खेळीसह अनेक विक्रमांना गवसणी घातली. रोहितने वर्ष 2019 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची नोंद केली. आणि आता रोहितनंतर वेस्ट इंडिजच्या शाई होप (Shai Hope) यानेही अशाच कामगिरीची नोंद केली आणि भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला मागे टाकले. विराटने यंदाच्या वर्षी आजवर 1292 धावांची नोंद केली आहे. भारताने दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या आशा कायम ठेवल्या होत्या.

होपने विशाखापट्टणम मॅचमध्ये 78 धावा केल्या. आणि त्याने 1303 धावांची नोंद केली. यासह तो विराटच्या फक्त काही धावा मागे आहे. या मॅचपूर्वी वर्ष 2019 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने अव्वल स्थान मिळवले होते, पण या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही आणि किरोन पोलार्ड याने त्याला पहिल्याच चेंडूवर बोल्ड केले. होपने या मॅचमध्ये मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले.

388 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला 280 धावांपर्यंत मजल मारता आली. विंडीजचा या सामन्यात 107 धावांनी पराभव झाला आणि 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आणली. आणि दोन्ही संघातील पुढील सामना आसामच्या कटक स्टेडियममध्ये खेळला जाईल.