विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty Images)

रविवारी वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध दुसर्या सामन्यात भारतीय संघ (India Team) गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करून आणखी एक टी-20 मालिका जिंकण्याच्या निर्धारित असेल. रविवारीचा सामना जिंकून भारताला फक्त दुसरी मालिका जिंकण्याचीच नाही तर टी-20 विश्वचषकपूर्वी ज्या खेळाडूंचे स्थान संघात निश्चित नाही अशा खेळाडूंना संधी देण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल. या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने पुन्हा एकदा सलामी फलंदाज आणि हिटमॅनच्या नावाने प्रसिद्ध रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा पुन्हा एक रेकॉर्ड मोडला आहे टी-20 चा बॉस बनला आहे. विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसर्या सामन्यात पहिल्या तीन धावा करत टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करण्याचा रोहितचा विश्वविक्रम मोडला आहे. या सामन्यापूर्वी, रोहितच्या टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 2547 धावा होत्या, तर विराट त्याच्या फक्त 3 धावांनी 2544 धावांवर होता. (IND vs WI 1st T20I: विराट कोहली याची नाबाद 94 धावांची खेळी, टी-20 मध्ये रोहित शर्मा याला पछाडत बनला No 1)

मालिकेच्या पहिल्या सामन्यात कोहलीने 94 धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टी -20 क्रिकेटमधील ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. या नाबाद खेळीसह विराटने आंतरराष्ट्रीय स्तरावर 23 वेळा 50 धावा करण्याबाबत रोहितला मागे टाकले. रोहितने 22 वेळा अर्धशतकं केली आहेत. दुसरीकडे, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहलीने भारतीय भूमीवर 975 धावा केल्या आहेत. या मॅचमध्ये 25 धावा करत भारतीय खेळपट्टीवर एक हजार टी-20 धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज बनेल. शिवाय, कोणत्याही एका देशात एक हजार धावा पूर्ण करणारा चौथा खेळाडू असेल.

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजय मिळवत भारतीय संघ अजून एक मालिका विजयाचा प्रयत्न करेल, तर विंडीज संघ मालिकेत कायम राहण्याचा प्रयत्न असेल. यापूर्वी पहिल्या मॅचमध्ये 6 विकेटने विजय मिळवत भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराटने नाबाद 94 धावांची खेळी करत एकहाती विजय मिळवला होता. केएल राहुल 62 धावांचे योगदान दिले.