IND vs WI 1st T20I: विराट कोहली याची नाबाद 94 धावांची खेळी, टी-20 मध्ये रोहित शर्मा याला पछाडत बनला No 1
रोहित शर्मा, विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत (India) -वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील मालिकेतील पहिल्या टी -20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने खेळाच्या सर्वात छोट्या स्वरूपात टीम इंडियाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागे टाकले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या मॅचमध्ये विराटने प्रभावी खेळी करत नाबाद 94 धावा फटकावल्या. त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर कोहलीने टीम इंडिया सामना जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि मालिकेतही 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. विंडीजविरुद्ध दमदार फलंदाजीदरम्यान विराटने टी-20 क्रिकेटमधील 23 वे अर्धशतक ठोकले. क्रिकेटच्या या छोट्या प्रकारात रोहितनेदेखील 22 अर्धशतकं केली आहेत. रोहितने 18 अर्धशतकं आणि चार शतकं केली आहेत. आणि हैदराबादच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावून कोहलीने रोहितला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला. (IND vs WI 1st T20I: विराट कोहली याला स्लेज करणे केसरीक विल्यम्स याला पडले महागात, संतप्तलेल्या 'किंग कोहली'ने या अंदाजात दिले प्रत्युत्तर, पाहा हा Video)

रोहित कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 50 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावांची खेळी केली. इतकंच नाही तर कोहली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावांचा टप्पा पार करणारा जगातील दुसरा क्रिकेटपटू बनला आहे. कोहलीने 73 सामन्यांमध्ये 50 च्या सरासरीने 2500 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने यापूर्वीही हा टप्पा गाठला होता, पण त्याने जवळपास 100 सामन्यात ही कामगिरी असल्याने कोहलीने रोहितला या प्रकरणातही मागे टाकले आहे.

केरळमधील तिरुअनंतपुरमच्या ग्रीन फील्ड्स स्टेडियमवर भारत-वेस्ट इंडीज विरुद्ध पुढील सामना खेळला जाईल. दरम्यान, विंडीजविरुद्ध आजच्या सामन्यात रोहित काही प्रभावी कामगिरी करू शकला नाही. त्याने 10 चेंडूत 8 धावा केल्या आणि खारी पियरेच्या गोलंदाजवर कॅच आऊट झाला. हैदराबादमधील भारतीय संघाच्या (Indian Team) पहिल्या विजयात विराटसह केएल राहुल आणि रिषभ पंत यांनीही हातभार लावला. पंतने छोटी खेळी केली पण, विराटला चांगली साठी दिली. विराट फॉर्ममध्ये असल्याने पंत सतत एक धाव घेत कोहलीला फलंदाजीला आणायचा. टी-20  मधील सर्वाधिक पन्नास धावा करण्याच्या यादीत रोहितनंतर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 18 वेळा पन्नास धावांचा टप्पा गाठला आहे.