टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) याने वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) मधील तिसऱ्या टी-20 सामन्यात एका विक्रमाला गवसणी घातली आहे. मालिकेच्या दुसऱ्या मॅचमध्ये रोहितने एक षटकार ठोकत 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेल (Chris Gayle) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांच्यासह एका खास यादीत समावेश झाला आहे. 2019 मध्ये रोहितने शानदार फलंदाजी केली आहे. यंदा सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित भारताकडून 400 षटकार मारणारा पहिला फलंदाज बनला आहे. रोहितने विंडीजच्या शेल्डन कोटरेल (Sheldon Cottrell) याच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. 'हा' पराक्रम करणारा रोहित क्रिकेट विश्वातील फक्त तिसरा तर पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या यादीत क्रिस 534 शतकारांसह पहिल्या, तर आफ्रिदी 476 शतकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, रोहितची फलंदाजी पाहत तो लवकरच आफ्रिदीचा रेकॉर्डही मोडेल यात शंका नाही. (IND vs WI ODI 2019: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेतून शिखर धवन आऊट, मयंक अग्रवाल याला मिळाली संधी)
या सामन्यापूर्वी रोहित न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याच्यासह संयुक्तपणे तिसर्या क्रमांकावर होता. मॅक्युलमने 474 सामन्यात 398 षटकार ठोकले आहेत. रोहितने कसोटीत 51 षटकार ठोकले आहेत, तर रोहितने टी-20 मध्ये 117 षटकार नोंदवले आहेत. रोहितनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय आहे. धोनीने 538 सामन्यात 359 षटकार लगावले आहेत. भारतीयांच्या यादीत सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने 664 आंतरराष्ट्रीय सामन्यात 264 षटकार ठोकले आहेत.
'हिटमन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने आजवर वनडेमध्ये 232, कसोटीत 52 आणि टी -20 मध्ये 116 षटकार ठोकले आहेत. नेहमीच फलंदाजीच्या पराक्रमासाठी ओळखला जाणारा रोहित आता एलिटच्या यादीमध्ये गेला असून यामध्ये गेल आणि आफ्रिदीतील आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट टी -20 मॅव्हरिक्सचा समावेश आहे. 2019 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. रोहितने 2017 आणि 2018 मध्येही हा विक्रम नोंदविला होता त्यामध्ये त्याने अनुक्रमे 65 आणि 74 षटकार ठोकले होते.