विराट कोहली (Photo Credits: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिला वनडे सामना वेस्ट इंडीजने 8 विकेट्सने जिंकला होता, त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी करो-या-मरोचा आहे. मालिकेत टिकण्यासाठी भारतीय संघाला फक्त जिंकण्याची गरज आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने दुसर्‍या सामन्यात टॉससाठी बाहेर आल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठा टप्पा गाठला. विशाखापट्टणममधील सामना विराटच्या 400 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत 84 वे कसोटी आणि 75 टी-20 सामने खेळले आहेत आणि हा त्याचा 241 वा एकदिवसीय सामना आहे. (CAA Protest: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध केल्याबद्दल सौरव गांगुली याची मुलगी सना ने मुस्लिम संघवर निशाणा साधला, केले 'हे' मोठे विधान)

विराटने त्याच्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला (Indian Team) अव्वल स्थानी नेऊन पोहचवले आहे. तसेच भारतीय संघ वनडेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतासाठी हा टप्पा गाठणारा विराट हा आठवा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकर याने सर्वाधिक 664, एमएस धोनी याने 538, राहुल द्रविड 509, मोहम्मद अझरुद्दीन 433, सौरव गांगुली 424, अनिल कुंबळे 403 and युवराज सिंह 402 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, विराट आपल्या फलंदाजीनेही गोलंदाजांची डोकेदुखी ठरत आहे. कोहलीने 54.98 च्या शानदार सरासरीने खेळलेल्या 84 कसोटी सामन्यांमध्ये 7202 धावा केल्या आहेत. तो ओनिडा आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तसेच त्याने कसोटी सामन्यात 27 शतकं आणि वनडे सामन्यात 43 शतके केली आहेत.

वेस्ट इंडिज कर्णधार किरोन पोलार्ड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघ 0-1 असा पिछाडीवरया आहे. विशाखापट्टममध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या सलामीच्या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. दोघे चांगली बॅटिंग करत आहेत.