CAA Protest: सौरव गांगुली याची मुलगी सना हिने विरोधकांना दिला पाठिंबा?
सौरव आणि सना गांगुली (Photo Credits: Twitter)

बीसीसीसीआयचे अध्यक्षपद सम्भाल्यावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) अजूनही जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या मुद्द्यांबाबत मौन बाळगून आहेत. पण त्याची मुलगी सना (Sana) हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्राम यासर्व घटनांवर आपले मत प्रदर्शित केले आहेत. सनाने विरोधकांना पाठिंबा दर्शविला सारखे आहे.  गांगुलीची मुलगी सनाने नागरिकत्व विधेयक (Citizenship Amendment Act) लागू झाल्यानंतर देशात सुरु असलेल्या निषेधावर तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीमध्ये आपले मत प्रदर्शित केले ज्यानंतर बरेच लोक तिचे कौतुक करीत आहेत, तर बरेच लोक तिच्या पोस्टला विरोध करत आहेत. खुशवंत सिंह यांनी लिहिलेल्या 'दी इंडिया ऑफ इंडिया' या लेखातील एक उतारा (2003 मध्ये प्रकाशित) सनाने शेअर केला, पण नंतर तो डिलिटही केला.  (CAA Protest: चिंतित इरफान पठाण, आकाश चोप्रा यांनी CAA च्या निषेधांमुळे जामिया विद्यार्थ्यांविषयी चिंता व्यक्त केले Tweet)

गांगुलीची मुलगी सना इंस्टाग्रामवर सक्रिय असते. कित्येक वेळा तिला आणि सौरवमधील इंस्टाग्रामवर थट्‍टामस्करी पाहायला मिळते. गांगुलीनेच टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वात कसे लढायचे हे शिकवले. निवृत्त झाल्यानंतर आता दुसऱ्या इनिंगमध्ये तो बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्षपद भूषवत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे प्रमुख झाल्यानंतर दादाएन गुलाबी बॉल डे-नाईट टेस्ट मॅचचे आयोजन करूनपुन्हा एकदा जगासमोर आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केली.

गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळ्यावर त्याला भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामुळे हे पद मिळाले असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आणखी एक अफवा अशी होती की शाह यांनी बंगालमध्ये गांगुलीला भाजपामध्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्यानंतर गांगुलीने आपण भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही याचा विचार करण्यास वेळ मागितला आहे.