
विश्वचषक सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्त समोर आले होते. वेस्ट इंडिज (West Indies) दौर्यावर जाण्यापूर्वी कर्णधार कोहलीने या सर्व गोष्टी नाकारल्या, पण वेळोवेळी या दोघांमधील दुरावा आल्याची झलक दिसून येत होती. कधी रोहित विराटला सोशल मीडियावर अनफॉलो करत होता तर कधी रोहित विराट कोहलीच्या फोटोजमधून गायब असायचा. जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या सर्व गोष्टी नंतर अखेर दोघे एकत्र आले. स्वतः कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर रोहित आणि अन्य टीम इंडियाच्या खेळाडूंचा फोटो शेअर केला. आणि ती सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमधील खास गोष्ट अशी आहे की प्रत्येकजण शर्टलेस आहे. (IND vs WI Test 2019: विराट कोहली याने शेअर केला टीम इंडियासह शर्टलेस फोटो; रोहित शर्मा याचाही समावेश)
विराटने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये कोहलीसह मयंक अग्रवाल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि केएल राहुल (KL Rahul) उपस्थित दिसत आहे. याशिवाय टीम इंडियाचे सपोर्ट स्टाफसुद्धा या फोटोमध्ये समाविष्ट आहे. या फोटोमध्ये सर्वात फिट बुमराह, विराट, मयंक आणि केएल राहुल दिसत आहेत. तर रोहितला जोरदारपणे ट्रोल केले जात आहे. या फोटोमध्ये रोहित राहुलच्या मागे उभा आहे आणि बर्याच लोकांनी टिप्पणी दिली की रोहित आपले पोट लपविण्यासाठी राहुलच्या मागे उभा आहे, तर काहींनी लिहिले आहे की जर रोहित पुढे असता तर त्याच्यावर बरेच मिम्स आले असते.




दरम्यान, कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने या दौर्यावरील टी-20 मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप घेतला, तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-0 अशी जिंकली. विंडीजविरुद्ध पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आगामी टेस्ट मालिकेसह दोन्ही संघाचा आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपचा प्रवासही सुरू होईल.