IND vs WI Test 2019: विराट कोहली याने शेअर केला टीम इंडियासह शर्टलेस फोटो; रोहित शर्मा याचाही समावेश
(Photo Credit: virat.kohli/Instagram)

टी-20 आणि वनडे मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) आता वेस्ट इंडिज (West Indies) संघाशी 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत दोन हात करण्यास सज्ज आहे. विंडीज दौऱ्याआधी विश्वचषकमधील पराभवानंतर टीम इंडियामध्ये दोन गट बोलले जात होते. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मर्यादित ओव्हर्सचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या वाद असल्याचे बोलले जात होते. पण, दोघांनी यावर स्पष्टीकरण देत या सर्व गोष्टी अफ़वाह असल्याचे सांगितले. यानंतर विराट आणि रोहितने सोशल मीडियावर अनेक विंडीजमधील काही फोटो देखील शेअर केले. मात्र, विराटच्या फोटोमध्ये कधी रोहित नसायचा तर रोहितच्या फोटोमध्ये विराट. यावरून चाहत्यांनी दोघांना एकत्र बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणि आता विराटने ती पूर्ण देखील केली. (IND vs WI 1st Test: अँटिगामध्ये विराट कोहली याला एम एस धोनी याच्या 'या' मोठ्या रेकॉर्डची बरोबरी साधण्याची संधी, वाचा सविस्तर)

विंडीज विरुद्ध पहिला टेस्ट सामना 22 ऑगस्टपासून अँटिगामध्ये सुरु होणार आहे. याआधी विराट आणि त्याची सेना विंडीजमधील त्यांच्या वेळेचा आनंद घेत आहे. विराटने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टीम इंडियासह स्विमिंग पूलमधील एक फोटो पोस्ट केलाय. यामध्ये संपूर्ण टीम इंडिया शर्टलेस दिसत आहे. आणि चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे यात रोहितदेखील आहे. पहा 'तो' फोटो इथे:

 

View this post on Instagram

 

Stunning day at the beach with the boys 🇮🇳👌😎

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

दरम्यान, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहली फलंदाज आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रमांची नोंद करू शकतो. एकीकडे तो माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याचा यशस्वी कर्णधाराचा रेकॉर्ड मोडीत काढू शकतो तर एक शतकासह तो माजी ऑस्ट्रेलिया कर्णधार रिकी पॉन्टिंग याचा टेस्टमध्ये शतकांच्या बाबतीत पिछाडीवर टाकू शकतो.