IND vs SA 2nd Test: रोहित शर्मा याच्या सलामीला फलंदाजी करण्याबाबत विराट कोहली चे मोठे वक्तव्य, BCCI च्या ट्विटवर दोघांचे चाहते भिडले
रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credits: FIle Image)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात दुसरा टेस्ट सामना उद्या, १० ऑक्टोबरपासून पुणेच्या महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जाईल. पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. आणि आता तिचा दुसरा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याच्या विचारात टीम इंडिया असेल. जेव्हा एखाद्या संघाचा सामना भारताशी होती तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) याला बाद करण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न करावे लागतात. पण, आता हे समीकरण बदलताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिका संघासाठी विराटआधी नवीन सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठी डोकेदुखी बनला आहे. पुणेमधील दुसऱ्या टेस्टआधी विराटने पत्रकार परिषद घेतली. यात अनेकांनी त्याला रोहित संबंधी प्रश्न विचारले. (IND vs SA Test 2019: जिमी निशम याचा रोहित शर्मा याला धक्का, 'हिटमॅन'च्या विझाग Masterclass ला दिली 'ही' रेटिंग)

कोहलीने भारताचा नवीन कसोटी सलामीवीर रोहितचे कौतुक केले आणि म्हणाला की, "त्याच्यासारखा (रोहित) एखादा खेळाडू टॉप ऑर्डरमध्ये खेळत असेल आणि चांगली कामगिरी करत असेल तर त्याने मॅचमध्ये मोठा फरक पडतो. त्याने पहिल्या टेस्टमध्ये असेच केले आहे. तो पुढेदेखील असेच करत राहिल्यास आम्ही सामना जिंकण्याच्या स्थितीत पोहोचू." विराट पुढे म्हणाला की, “'त्यामुळे आम्ही सर्वजण रोहितच्या कामगिरीने खूप खूश आहोत. म्हणूनच, आता आम्ही त्यांच्या स्पॉट (ओपनिंग) बद्दलच्या चर्चेतून पुढे गेले पाहिजे. त्याला त्याची फलंदाजी एन्जॉय करू दिली पाहिजे." बीसीसीआयने विराटचे हे वक्तव्य करतानाच व्हिडिओ शेअर केला. आणि याच्यावर रोहित आणि विराटचे चाहते एकमेकांशी भिडले.

पहा या व्हिडिओवरील काही टिप्पण्या: 

व्हीके चे चाहते

विराट कोहली: हे बोलताना भीती फक्त मला वाटते

का ?? तो एका भिकाऱ्याला फक्त भिकारी देत आहे जो बराच काळ ओपनिंग जागेसाठी भीक मागत आहे

त्या भिकारीला आताच मॅन ऑफ द मॅच मिळाला आहे... शब्द काळजीपूर्वक वापरा

दक्षिण आफ्रिकाइरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात रोहितने दोन्ही डावात शतके ठोकली होती. त्याने पहिल्या डावात 176 धावा आणि दुसऱ्या डावात 127 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 203 धवनी जिंकला होता. रोहितशिवाय मयंक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगली कामगिरी केली. या सामन्यात मयंकने दुहेरी शतक झळकावले. मयंकने पहिल्या डावात 215 आणि पुजाराने दुसऱ्या डावात 81 धावा केल्या होत्या. अश्विनने सामन्यात एकूण आठ बळी घेतले. त्याचप्रमाणे जडेजाने सहा विकेट आणि शमीने सामन्यात पाच विकेट घेतले.