जिमी निशम, रोहित शर्मा (Photo Credit: Getty Images)

सलामी फलंदाज म्हणून टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टेस्ट मॅचमधील परदारपणाच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली. रोहितने टेस्ट सलामीवीर म्हणून पदार्पणाच्या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक ठोकले, परंतु न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी नीशम (Jimmy Neesham) यांनी मंगळवारी याबाबत आपले मत व्यक्त करून वादाला निमंत्रण दिले आहे. नीशमने रोहितच्या खळबळजनक पदार्पणाला सामान्य म्हणून संबोधले आहे. किवी अष्टपैलूला अलीकडे रोहितच्या खेळीबद्दल विचारले गेले. रोहित हा पांढऱ्या बॉल क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो, परंतु 32 वर्षीय फलंदाज रेड बॉल क्रिकेटमध्ये तितका यशस्वी झाला नाही. पण, जेव्हा 'हिटमॅन' टेस्ट क्रिकेटमध्ये सलामीला आला तेव्हा गोष्टी आपणुन बदलून गेल्या. त्याने दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये अनुक्रमे 176 आणि 127 धावांची खेळी खेळून आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याच्या मदतीने भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयाची हॅटट्रिक केली. (IND vs SA 2nd Test: सौरव गांगुली याचा 'हा' रेकॉर्ड मोडत एमएस धोनी च्या विक्रमाकडे विराट कोहली टाकणार अजून आणखी एक पाऊल, वाचा सविस्तर)

नीशमने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. एका यूजरने त्याला विचारले की रोहितचा कसोटी सलामीवीर म्हणून तुमचे मत काय आहे? याच्यावर तो म्हणाला की, मला वाटते की त्याने योग्य सुरुवात केली. निशामने रोहितच्या कसोटी सलामीवीर म्हणून खेळीचे जाहीर कौतुक केले नसले तरीही कोणत्याही फार्मेटमध्ये तो जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे भारतीय फलंदाजाने दाखवून दिले.

रोहितने विशाखापट्टणमच्या मैदानात खेळलेल्या मॅचमध्ये दोन्ही डावात शतक केले आणि मिळेल संधी दोन्ही हाताने पकडली. आणि अनेक ऐतिहासिक खेळी केली. चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेला 203 धावांचे विशाल देण्यात रोहितने महत्वाची भूमिका बजावली. रोहितने या मॅचमध्ये एकूण 13 षटकार लगावले, जो की एक वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे. रोहितच्या या खेळीचा त्याला आयसीसी टेस्ट फलंदाजांच्या रँकिंगमध्ये खूप फायदा झाला आहे.