IND vs SA 2nd Test: सौरव गांगुली याचा 'हा' रेकॉर्ड मोडत एमएस धोनी च्या विक्रमाकडे विराट कोहली टाकणार अजून आणखी एक पाऊल, वाचा सविस्तर
विराट कोहली, सौरव गांगुली (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa0 संघ यंदाच्या टेस्ट मालिकेत दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज होत आहेत. दोन्ही संघातील दुसरा टेस्ट सामना 10 ऑक्टोबर, उद्यापासून पुणेच्या महाराष्ट क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल. 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत भारताने पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. आणि आता दुसऱ्या मॅचमध्ये, एकीकडे टीम इंडियासामना जिंकत मालिका जिंकण्याच्या निर्दारात असेल टर्म अफ्रिकी संघ पुनरागमन करत मालिकेत टिकून राहण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघातील पहिल्या मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली. रोहित शर्मा पासून रविचंद्रन अश्विन पर्यंत भारतीय खेळाडूंनी विक्रमांची जणू लाईनच लावली. आणि आता, दुसऱ्या मॅचमध्ये देखील अजून एक विक्रम मोडला जाणार आहे. (रोहितची उत्तुंग भरारी, तर अश्विनची टॉप 10 मध्ये धडक)

दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध दुसरी टेस्ट मॅच विराट कोहली (Virat Kohli) याची कर्णधार म्हणून 50 वी मॅच असणार आहे. यासह विराट माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला मागे टाकेल. गांगुलीने कर्णधार म्हणून49 टेस्ट सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहेत. यासह, विराट माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्या 60 टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नेतृत्व करण्याच्या रेकॉर्डच्या जवळ पोहचण्यासाठी अजून एक पाऊल पुढे टाकेल. गांगुलीच्या नेतृत्वात संघाने 21 सामन्यात विजय मिळवला आहे तर 13 मॅचमध्ये पराभवाला सामोरे गेले आहेत. दुसरीकडे, आजवर विराटच्या नेतृत्वात संघाने 49 टेस्ट सामन्यात 29 सामन्यात विजय आणि 10 मॅचमध्ये पराभव चाखला आहे. विशेष म्हणजे, अन्य भारतीय टेस्ट कर्णधारांमध्ये विराटचा रेकॉर्ड सर्वात प्रशंसनीय आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात विशाखापट्टणम येथे खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बॅटिंग आणि बॉलिंगने वर्चस्व गाजवले. टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजीत शानदार प्रदर्शन केले. दरम्यान, दुसऱ्या टेस्टमध्ये विजय मिळवत, दक्षिण आफ्रिकाविरूद्ध घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम करण्याची विराटकडे एक संधी आहे.यापूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने घरच्या मैदानावर खेळात सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. अशा प्रकारे, अजून एक मालिका जिंकत विराट विश्वविक्रम करू शकतो.