IND vs SA 3rd Test Day 4: केपटाउन कसोटी सामन्यात ‘या’ दोन खेळाडूंना बाद करून विराट कोहलीची टीम इंडिया रचू शकते इतिहास, एक चूक पण पडणार महागात
कीगन पीटरसन आणि टेंबा बावुमा (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 4: केपटाउनच्या न्यूलँड्स (Newlands) येथे सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात ही मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. त्याचवेळी तिसरा सामना कोण जिंकणार हे आज कळेल. आज केपटाउन  (Cape Town) कसोटी सामन्याचा चौथा दिवस असून निकाल लागण्याची मोठी शक्यता आहे. टीम इंडियाने आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही त्यामुळे भारतीय संघ (Indian Team) हा सामना जिंकून मालिका काबीज करण्याची ‘विराटसेने’कडे सुवर्ण संधी आहे. (IND vs SA 3rd Test: शतक एक पण विक्रम अनेक! 8व्या कसोटी सेंच्युरीसह Rishabh Pant ने केला विक्रमांचा भडीमार, पहा आज केपटाउन कसोटीत बनले कोणते रेकॉर्ड)

आता हा सामना जिंकून भारतीय संघ कसा इतिहास रचू शकतो याबद्दल बोलायचे तर शुक्रवार, 14 जानेवारी रोजी सामन्याच्या चौथ्या दिवशी झटपट 44 धावांची खेळी करणाऱ्या कीगन पीटरसन आणि त्यानंतर टेंबा बावुमा यांना भारतीय गोलंदाजांनी बाद केले, तर भारतासाठी सामना जिंकणे सोपे होईल. तथापि तसे झाले नाही तर भारतीय संघ ही मालिका आणि सामना गमावेल. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात भारतीय खेळाडूंची एक चूक संघाला महागात पडू शकते. सामन्याच्या चौथ्या दिवशी आता यजमानांना विजयासाठी केवळ 111 धावा करायच्या आहेत आणि त्यांच्या 8 विकेट शिल्लक आहेत. पीटरसन आणि बावुमा, या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना आतापर्यंत मालिकेत खूप त्रास दिला आणि संघासाठी धावाही केल्या आहेत. जर भारताने हा सामना जिंकला तर प्रथमच टीम इंडिया या देशात कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी होईल.

सामन्याबद्दल बोलायचे तर भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, संघाचा पहिला डाव 223 धावांत आटोपला. कर्णधार कोहलीने सर्वाधिक 79 धावा केल्या, तर चेतेश्वर पुजाराने 43 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने चार, तर मार्को जॅन्सनने तीन विकेट घेतल्या. भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे यजमानांना त्यांनी 210 धावांत गुंडाळले आणि 13 धावांची निसटती आघाडी घेतली. या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने 5 तर उमेश यादव आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 बळी घेतले. यानंतर दुसऱ्या डावात रिषभ पंत वगळता एकाही फलंदाजाला भारतासाठी फारसा प्रभाव पाडू शकला नाही. पंतने नाबाद 100 धावा केल्या आणि विराट कोहली 29 धावांवर बाद झाला. याशिवाय अन्य फलंदाजांनी निराशा केली आणि संघ 198 धावांत गुंडाळला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य मिळाले.