रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना केपटाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात टीम इंडिया (Team India) 198 धावांवर गुंडाळल्यावर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने दिवसाखेरीस दोन विकेट गमावून 101 धावा केल्या आहेत. भारताकडून स्टार युवा फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) नाबाद 100 धावा केल्या तर उर्वरित भारतीय संघाने (Indian Team) मिळून 70 धावा केल्या. अशा परिस्थितीत Proteas देशात पहिल्या कसोटी विजयासाठी भारतीय संघ आता शिल्लक 8 विकेटच्या शोधात आहे. टीम इंडियाने पहिल्या डावातील 223 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकी संघाचा डाव 210 धावांत आटोपला. केपटाउनच्या न्यूलँड्स (Newlands) येथील तिसऱ्या दिवशी बनलेले रेकॉर्ड खालीलप्रमाणे आहेत. (IND vs SA 3rd Test Day 3: दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 101 धावा; टीम इंडिया विजयापासून 8 विकेट दूर)

1. भारताचा स्टार युवा फलंदाज रिषभ पंतने केपटाउन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी 133 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह कारकिर्दीतील आठवे कसोटी शतक ठोकले आहे.

2. न्यूलँड्स येथील हे शतक पंतचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि Proteas देशातील पहिले ठरले आहे. त्याचबरोबर परदेशातील हे त्याचे तिसरे कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही शतके झळकावली आहेत.

3. रिषभ पंतने केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटीत शतक झळकावणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

4. पंतने भारताचा माजी कर्णधार आणि महान यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीचा विक्रमही मोडला. दक्षिण आफ्रिकेत सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या करणारा यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत पंत आता अव्वल स्थानी पोहोचला. यापूर्वी धोनीने 2010 मध्ये सेंच्युरियनमध्ये 90 धावा करून यादीत पहिले स्थान पटकावले होते.

5. विराट कोहली आणि रिषभ पंत यांच्यात पाचव्या विकेटसाठी 94 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. दक्षिण आफ्रिकेत पाचव्या विकेटसाठी भारताची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. दक्षिण आफ्रिकेत 5व्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. 2001-02 दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोघांनी 202 धावांची भागीदारी केली होती.

6. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत शतक झळकावणारा तो केएल राहुलनंतर दुसरा भारतीय फलंदाज आहे. राहुलने सेंच्युरियन येथे झालेल्या सलामीच्या सामन्यात शंभरी धावसंख्या ओलांडली होती.

7. पंत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांत 3 शतके झळकावणारा भारतासह आशियातील पहिला यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे.