कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका (South Africa) विरूद्ध मोहाली येथे झालेल्या दुसऱ्या सामना टी-20 सामना टीम इंडियाने 7 गडी राखून जिंकला. आता टीम इंडिया, बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम (M Chinnaswamy Stadium) वर शेवटचा टी-20 सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या निर्धारित असेल. हा सामना आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. धर्मशाळेत खेळलेला पहिला सामना पावसामुळे रद्द केला गेला होता आणि आता सर्व चाहत्यांचे डोळे पुन्हा बेंगळुरूच्या हवामानाकडे लागले आहेत. या मॅचमध्ये पाऊस पुन्हा एकदा खलनायक बनण्याची शक्यता आहे, कारण आज बेंगळुरूमधील हवामान क्रिकेटसाठी अनुकूल दिसत नाही. (Ind Vs SA 3rd T20 Match: रिषभ पंत याच्या अडचणी वाढल्या; भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना ठरु शकतो अखेरचा)
पूर्व मध्य अरबी समुद्राला निम्न दाब दिसेल, ज्यामुळे अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक, तामिळनाडू आणि अंदमान व निकोबारमध्ये जोरदार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे, पण जर आपण एक्यू वेदरच्या अंदाजाप्रमाणे आजचा सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. आज बेंगळुरूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मॅचमधील काही ओव्हर्स कमी होऊ शकतात. या सामन्यादरम्यान आकाशात ढग दाट असतील अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. हलका पाऊसही पडू शकतो. शिवाय, वादळी वाऱ्याचीदेखील शक्यता आहे. हवामान खात्यावर पावसाची शक्यता 56 टक्के आहे.
तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ (Indian Team( सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. तिसऱ्या टी-20 मॅच आधी टीम इंडियाचे पूर्व कर्णधार आणि 'द वॉलच्या नावाने प्रसिद्ध राहुल द्रविड यांनी संघासोबत काही वेळ व्यतीत केला. विशेषतः त्यांनी रिषभ पंत याला काही टिप्स दिल्या. पंत मागील काही वेळेपासून फॉर्ममध्ये नाही आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर दबाव वाढत चालला आहे. टीम इंडिया मागील काही मॅचपासून चांगला प्रदर्शन करत आहे. फलंदाजीवर टीम इंडियाचे पूर्ण नियंत्रण आहे आणि हीच अवस्था गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही आहे.